मुलुंडमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका बंद घराची भिंत कोसळून एक महिला ठार, तर एक जण जखमी झाला. भिंत शेजारच्या घरावर पडल्यामुळे ही दुर्घटना घडली. मुलुंड पश्चिमेकडील हनुमानपाडा येथे शुक्रवारी पहाटे ही दुर्घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका बंद घराची भिंत बाजूच्या घरावर पडली.या दुर्घटनेत बाजूच्या घरातील लक्ष्मीबाई कताडे (४०) आणि रघुनाथ कताडे (५०) जखमी झाले. त्यांना जवळच्या अगरवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी लक्ष्मीबाई यांना मृत घोषित केले. तर रघुनाथ यांच्यावर उपचार करून घरी पाठविण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman was killed when the wall of her house collapsed in mulund mumbai print news amy