धावत्या लोकलमध्ये महिलेची निर्घृण हत्या करण्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे नालासोपारा स्थानकात घडली. पंग्या जन्या अंधेर (५५) असे मृत महिलचे नाव आहे.
व्यवसायाने भाजीविक्रेत्या असलेल्या पंग्या विरार येथून पहाटे तीन वाजून ५३ मिनिटांनी निघणाऱ्या चर्चगेट लोकलमधील मालडब्यातून प्रवास करत होत्या. गाडी नालासोपारा स्थानकात आली असता डब्यात एक अज्ञात व्यक्ती चढली. या व्यक्तीने पंग्या यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने तीन वार केले आणि तो घटनास्थळावरून पसार झाला. या हल्ल्यात पंग्या जबर जखमी झाल्या. मोटरमन जीतेश राठोड व गृहरक्षक दलाच्या जवानाने त्यांना वसईतील रुग्णालयात केले पण तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. हत्येचे कारण समजू शकलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा