मुंबई : मुंबई विद्यापीठाने सांताक्रुझ येथील कलिना संकुलात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे वसतिगृह उभे केले. त्याचे उद्घाटन जुलै २०२२ मध्ये तत्कालीन कुलपती व माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु एक वर्षाच्या कालावधीनंतरही हे वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आलेले नाही.

राज्यात परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत पुणे आणि मुंबई आघाडीवर आहेत. येणारे बहुतेक विद्यार्थी या दोन शहरांतील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यास प्राधान्य देतात. मात्र, त्यांच्यासाठी सुयोग्य सुविधांचा अभाव असल्याची चर्चाही सातत्याने होते असते. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी चर्चगेट येथील सी मार्गावर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह होते. वसतिगृहाची इमारत जीर्ण झाल्यामुळे ती राहण्यासाठी धोकादायक होती. त्यामुळे हे वसतिगृह बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसमोर राहण्याचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी कलिना संकुलात नवीन इमारत बांधण्याचे विद्यापीठाने ठरवले. त्याचे बांधकाम पूर्ण होऊन उद्घाटनही झाले. मात्र, नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. तरीही अद्याप हे वसतिगृह वापरात आलेले नाही.

passport drama
लोकसत्ता लोकांकिका : ‘पासपोर्ट’ महाअंतिम फेरीत, नागपूर विभागीय अंतिम फेरी जल्लोषात
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Students selected for regional finals said Loksatta Lokankika competition is different from others
लोकसत्ता लोकांकिकाच्या विभागीय अंतिम फेरीला उत्साहात सुरुवात, सहभागी विद्यार्थी म्हणतात…
Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
celebrations at durgadi fort in kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे जल्लोष

हेही वाचा – वृक्षांची कत्तल वा पुनर्रोपणाच्या सुनावणीसाठी आक्षेप आणि सूचना ऑनलाईन पद्धतीनेच, मुंबई महानगरपालिकेचा उद्यान विभाग अद्याप ‘करोना काळातच’

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीचे नवीन वसतिगृह हे सहा मजली आहे. १४६ विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या वसतिगृहात वाचन कक्ष, ग्रंथालय आदी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. सध्या मुंबई विद्यापीठातील विविध विभाग आणि संलग्नित महाविद्यालयात जवळपास २०० आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिकत आहेत.

नामकरणावरून वाद कायम

तत्कालीन कुलपती व माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ८ जुलै २०२२ रोजी वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी कोश्यारी यांनी भाषण करताना वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची मागणी केली होती. राज्यपालांच्या या मागणीनंतर काही विद्यार्थी संघटनांनी त्याला विरोध केला. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्याची मागणी छात्र भारती विद्यार्थी संघटनेने केली. या वसतिगृहाला कोणाचे नाव द्यावे याचा अद्यापही निर्णय झाला नसल्याचे समजते आहे.

हेही वाचा – Video : “वार होते कडवट, जिव्हारी आणि…”, वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेचं खास ट्वीट; वर्षभराचा आढावा काव्यरुपात सादर

वसतिगृह सुरु करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. वसतिगृहास निवासी दाखलाही मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी हे वसतिगृह लवकरात लवकर सुरू करून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. उद्घाटनानंतर वसतिगृह सुरू करण्यासाठीची आवश्यक ती प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे वसतिगृह सुरू करण्यास विलंब झाला, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

Story img Loader