हत्येच्या साधारण वर्षभरापूर्वी शीना बोराची सावत्र बहीण विधी मुखर्जी हिने शीनाला तिच्या जीवाला धोका असल्याचा इशारा दिला असल्याची बाब उघडकीस आली आहे. सीबीआयने सादर केलेल्या आरोपपत्रात ही बाब नमूद करण्यात आली आहे. विधीने मार्च 2011मध्ये शीनाला मोबाईलवरून एसएमएसम पाठवून याबद्दल सांगितले होते. आईला तिच्या मार्गातून कोणाला तरी दूर करायचे आहे, असे विधीने या एसएमएसमध्ये म्हटले होते.
सीबीआयच्या माहितीनुसार शीना आणि राहुल मुखर्जी यांनी 2011मध्ये इंद्राणीच्या इच्छेविरुद्ध एकमेकांशी साखरपुडा केला होता. त्यावेळी इंद्राणी मुखर्जी, पीटर, राहुल आणि शीना यांच्यात मोठा वादही झाला होता. त्यानंतर पीटर मुखर्जी यांची मुलगी विधी हिने शीनाला मोबाईलवरून हा संदेश पाठवला होता. तु आणि राहुलने काळजीपूर्वक राहिले पाहिजे कारण आई तुमच्या दोघांमुळे काळजीत आहे. त्यामुळे मी तुम्हाला इशारा देत आहे. काहीतरी नक्कीच होणार आहे. तू याबद्दल कोणलाही बोलू नकोस नाहीतर माझं मरण निश्चित आहे. असं नाही झालं तरी आई नक्कीचं काहीतरी वाईट करणार आहे… या सगळ्यावर तू विश्वास ठेवावा, असे मला वाटते. आई म्हणते की तिला कोणतेही नाते तोडायचे नाही… तिला कोणालातरी मार्गातून दूर करायचे आहे, असे विधीने या एसएमएसमध्ये म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा