मुंबई : मुलुंड परिसरातील एका मंदिरात गुरुवारी पहाटे साफसफाई करताना विजेचा शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा – मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे जानेवारीमध्ये सर्वेक्षण

हेही वाचा – ठाण्यातील पादचारी पुलाच्या कामांसाठी शनिवारी मध्यरात्री ब्लॉक

मुलुंडमधील बाल राजेश्वर मंदिरात बुधवारी रात्री उशिरापर्यंत भजनाचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर मंदिरात साफसफाई सुरू होती. मुलुंडमधील कटिपाडा परिसरात राहणारा नीलेश भिडे (३१) हाही साफसफाईचे काम करीत होता. साफसफाई करताना त्याचा टेबल फॅनला स्पर्ष झाला. त्यावेळी त्याला शॉक बसला. स्थानिक रहिवाशांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Story img Loader