मुंबई – कुर्ला येथील अपघातानंतर चर्चांच्या फैरी झडल्या असल्या तरी बेस्टच्या बसेसचे अपघात आटोक्यात आलेले नाहीत. बेस्टच्या भाडेतत्वावरील गाड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. गोराई आगाराच्या परिसरात मंगळवारी अशाच एका अपघातात एका तरुणाचा जीव गेला. गोराई परिसरात बेस्टच्या बसचा या महिन्यातील हा तिसरा अपघात आहे.

बेस्टच्या भाडेतत्वावरील गाडीला कुर्ला येथे झालेल्या भीषण अपघातानंतर बेस्टच्या अपघातांच्या अनेक घटना बाहेर येऊ लागल्या आहेत. गोराई परिसरातही बेस्टच्या भाडेतत्वावरील बसने अपघात केल्याच्या तीन घटना या महिन्यात घडल्या आहेत. त्यातच मंगळवारी २१ जानेवारी रोजी झालेल्या अपघातात एका तरुणाने जीव गमावल्यामुळे या अपघातांचे गांभीर्य वाढले आहे. मंगळवारी झालेल्या अपघातात बसच्या चाकाखाली आल्यामुळे याच परिसरात राहणाऱ्या वैभव कांबळे याचा मृत्यू ओढवला. गोराई बसआगाराच्या लगत आकाशवाणी जवळ एल टी मार्ग येथे मंगळवारी सायंकाळी हा अपघात घडला. यावेळी दुचाकीला बेस्टच्या बसगाडीची धडक लागल्यामुळे अपघात झाला आणि दुचाकीस्वार बसच्या मागील चाकात येऊन त्याचा अपघात झाला. वैभव हा याच परिसरातील नंदनवन इमारतीत राहत होता. एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे त्यांच्या कुटंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ST buses Amravati scrap , passengers Amravati ST bus,
अमरावतीत १४९ एसटी बसेस भंगारात; कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
How should a driver board an ST bus the driver demonstrated Lalpari new video goes viral netizens mock it
चालकाने एसटी बसमध्ये कसे चढावे? पुन्हा एकदा चालकाने दाखवलं प्रात्यक्षिक; लालपरी’चा नवा Video Viral, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Trials underway to launch Amrut Bharat Express from Pune on four routes in North India Pune print news
पुण्यातून ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ उत्तर भारतातील चार मार्गांवर सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
Dabhol - Mumbai ST bus skidded off road and overturned at Chinchali Dam
दाभोळ-मुंबई एस.टी. बस खोल धरणात कोसळताना वाचली; ४१ प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास
lalpari
तुम्हीच सांगा, चूक कोणाची? दरवाजा एकीकडे अन् पायऱ्या दुसरीकडे, चालकाने दाखवली चूक; पाहा ‘लालपरी”चा Video Viral

हेही वाचा >>>कांजुरमार्ग येथली हत्येप्रकरणी दोघांना अटक; कांजूर मेट्रो कारशेड परिसरात सापडला होता मृतदेह

दरम्यान, वैभवच्या अपघातामुळे गोराई परिसरातील वाढत्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोराई परिसरात अपघातांची संख्या वाढली असून हे अपघात बेस्टच्या बसगाड्यांमुळे होत असल्याचा आरोप या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शिवा शेट्टी यांनी केला. त्यांनी सांगितले की, ८ जानेवारीला देखील असाच एक अपघात घडला होता. त्यावेळी गोराई आगारातून बसगाडी स्टॉपवर वळण घेत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे भयानक अपघात घडला. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराने वेळीच उडी मारल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, दुचाकी बसखाली जाऊन अडकून राहिली.

त्यानंतर १० जानेवारीला देखील त्याच परिसरात ठिकाणी एक मोठा अपघात झाला. डॉन बॉस्को शाळेजवळ एल.टी. मार्ग येथे हा अपघात घडला. बेस्टच्या बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे दुचाकीस्वार व चारचाकीस्वारांचा अपघात झाला. धडक लागल्यानंतर दुचाकीस्वार बाजूला पडल्यामुळे मोठी हानी टळली. त्याला कोणतीही गंभीर इजा झाली नाही, मात्र, दुचाकीला बसने सुमारे २० मीटरपर्यंत फरफटत नेले.

बसचे अपघात होऊ नये म्हणून बस आगारातून गाडी निघण्यापूर्वी ब्रेक, ऑईल व इतर यंत्रणा व्यवस्थित तपासाव्यात. चालकाने मद्यपान केले आहे का तसेच त्याची शारीरिक व मानसिक स्थिती योग्य आहे का, हे तपासले जावे तसेच नवीन विद्युत बस चालवण्याचे चालकांना पुरेसे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी शिवा शेट्टी यांनी केली आहे.

हेही वाचा >>>वृद्धापकाळातील आरोग्य सेवा गतिमान करणार! वर्षभरात साडेदहा लाख वृद्धांवर उपचार…

परिसरात गतीरोधक लावण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

गोराई परिसरात अपघातांना आळा घालण्यासाठी या परिसरात गतीरोधक तयार करावे व प्रत्येक शाळेच्याबाहेर झेब्रा पट्टे मारावेत अशी मागणी शेट्टी यांनी पालिकेच्या विभाग कार्यालयाकडे गेल्यावर्षी केली होती. मात्र त्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. मंगलमूर्ती इमारत, प्रगती शाळा, पिल्लई शाळा, सेंट्र रॉक्स शाळा, नालंदा शाळा अशा सर्व शाळांच्या समोरील रस्त्यावर या उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कंत्राटदाराने वैभवच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी

कंत्राटदाराच्या चालकांच्या चुकीमुळे कांबळे कुुटंबाने एकुलता एक मुलगा गमावला आहे. त्यामुळे कंत्राटदाराने या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवा शेट्टी यांनी केली आहे. इलेक्ट्रिक गाड्या चालवण्याचे योग्य प्रशिक्षण या चालकांना दिलेले नसल्यामुळे हे अपघात घडत असून यावर कोणाचेही नियंत्रण नाही, असाही आरोप यांनी केला.

अपघात कसा झाला?आरोपी बेस्ट बसचालक संदेश श्रीकांत सुतार (३२) भारधाव वेगात बस चालवत होता. दुचाकीला ओलांडून जाण्याचा प्रयत्न तो करीत होता. त्यावेळी बेस्ट बसने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात. दुचाकीस्वार वैभव विजय कांबळे(२५) खाली कोसळला. या अपघातात वैभव गंभीर जखमी झाला. त्याला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी कांबळेला मृत घोषित केले. याप्रकरणानंतर पोलिसांनी तात्काळ कांबळेची माहिती काढून त्याचे वडील विजय कांबळे यांना अपघाताची माहिती दिली. याप्रकरणी वैभवचे वडील विजय कांबळे यांच्या तक्रारीवरून बोरिवली पोलिसांनी सुतार विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader