नंदन निलेकणी यांचे प्रतिपादन
नव्याने अस्तित्वात येत असलेले तंत्रज्ञानाच्या संदर्भातील प्लॅटफॉम्र्स भविष्यातील अनेक गोष्टींसाठी नव्या संधी निर्माण करतील. आता आलेल्या आधार क्रमांकामुळेच काही कोटींची नवीन बाजारपेठ उभी राहणार असून ‘आधार’वर आधारित येणाऱ्या नवीन मोबाईल अॅप्लिकेशन्सचा त्यामध्ये मोठा वाटा असेल, असे प्रतिपादन यूआयडीआयचे प्रमुख नंदन निलेकणी यांनी गुरुवारी येथे केले.
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कंपन्यांची शिखर संस्था असलेल्या नासकॉमच्या २०१३च्या वार्षिक अधिवेशनात आयोजित ‘फ्यूचर फॉरवर्ड इमॅजिनिअरींग इंडिया’ या परिसंवाद वक्ते म्हणून नंदन निलेकणी बोलत होते. येणाऱ्या पाच वर्षांत भारतामध्येच तब्बल २००० कोटींची बाजारपेठ निर्माण होणार आहे. या विषयी बोलताना ते म्हणाले की, आता सरकारने ‘आधार’च्या निमित्ताने बँक खात्यापासून ते सबसिडी आणि तुमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या इतर सेवाही एकत्रित केल्या आहेत. येणाऱ्या काळात या एकत्रित सेवांची संख्या वाढलेली असेल. त्यामुळे उपयुक्त अशा मोबाईल अॅप्लिकेशन्स संख्याही वाढणे महत्त्वाचेच असणार आहे. येणाऱ्या काळात अशी अनेक अॅप्स ‘आधारमय’ होतील. गुगल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन म्हणाले की, भारतामध्ये इ- कॉमर्सची सुरुवात अवघ्या तीन वर्षांपूर्वीच झाली आहे. तेव्हा ही बाजारपेठ केवळ दोन दशकोटींची होती. गेल्या तीन वर्षांमध्ये या क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये वाढ झालेली नसतानाही ही बाजारपेठ १० दशकोटींपर्यंत पोहोचली आहे. येत्या पाच वर्षांमध्ये ही बाजारपेठ तब्बल १०० दशकोटींची होईल. त्यासाठी संबंधित कंपन्यांनी आतापासूनच कंबर कसायला हवी.
भविष्यात मोबाईल बाजारपेठेत आधार क्रमांकाधारित अॅप्स
नव्याने अस्तित्वात येत असलेले तंत्रज्ञानाच्या संदर्भातील प्लॅटफॉम्र्स भविष्यातील अनेक गोष्टींसाठी नव्या संधी निर्माण करतील. आता आलेल्या आधार क्रमांकामुळेच काही कोटींची नवीन बाजारपेठ उभी राहणार असून ‘आधार’वर आधारित येणाऱ्या नवीन मोबाईल अॅप्लिकेशन्सचा त्यामध्ये मोठा वाटा असेल, असे प्रतिपादन यूआयडीआयचे प्रमुख नंदन निलेकणी यांनी गुरुवारी येथे केले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-02-2013 at 05:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadhaar number base apps in mobile market in future aadhaar mobile