सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पनवेल शहरातील मोराज रिवर साईट पार्क येथील बँकेच्या शाखेत २८ नोव्हेंबरपासून आधार नोंदणीचे काम सुरू झाले आहे. नोंदणीचे काम सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. पनवेल येथील आधार नोंदणीचे हे काम ठाणे येथील बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. पनवेल येथील मोराज रिवर साईट पार्कमधील रहिवाशांनी आधार नोंदणी केली नव्हती. त्यांना सेंट्रल बँकेचे अधिकारी एम.एम. कांबळे आणि गोपालन यांनी या  नोंदणीचे महत्त्व पटवून दिले. तसेच ही नोंदणी कशा प्रकारे करावी याचे मार्गदर्शनही केले.

Story img Loader