भिन्नमती व्यक्तींचे आयुष्यभर संगोपन करणाऱ्या बदलापूरजवळील मुळगांव येथील ‘आधार’ या पालक संस्थेस राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली येथे समारंभपूर्वक हा पुरस्कार संस्थेला दिला जाईल. एक लाख रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
अपंग दिनाच्या निमित्ताने केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अपंग व्यक्ती तसेच संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यंदा संस्था विभागात पारितोषिक मिळविणारी ‘आधार’ ही एकमेव संस्था आहे. १९९४ मध्ये माधव गोरे यांनी मतिमंद मुलांच्या पालकांना संघटित करून ‘आधार’ संस्थेची स्थापना केली. त्याच वर्षी बदलापूरजवळील मुळगाव येथे संस्थेने कायमस्वरूपी निवासी केंद्र उभारले. पालकांचे मासिक योगदान आणि सामाजिक संस्था तसेच व्यक्तींकडून मिळणाऱ्या देणग्या याच्या आधारे संस्थेचे कार्य चालते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा