मुंबई महापालिकेतीn कारभारावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. मुंबई महापालिकेत दडपशाही, हुकूमशाही सुरु असून अधिकारी दबावाखाली काम करत आहेत. पालिकेत टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास सुरु आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या रस्त्यांसाठी ५ हजार कोटींची घोषणा केली होती. पण, मर्जीतील लोकांना टेंडर न मिळाल्याने ते रद्द करण्यात आले का?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“१ ऑक्टोंबर ते १ जून मध्ये मुंबईतील रस्त्यांची काम केली जातात. पण आता टेंडर रद्द करण्यात आल्याने, नवे टेंडर कधी काढले जाणार. रस्त्यांची कामं कधी होणार आणि कोणत्या रस्त्यांची करण्यात येणार. रस्त्यांसाठी करण्यात आलेल्या पाच हजार कोटींच्या घोषणेमुळे मागील काम रखडली गेली आहे. येत्या पावसाळ्यात जर मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला, तर याला घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि पालिकेचे प्रशासन जबाबदार राहिल,” असेही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

हेही वाचा : “१०० वर्षांपूर्वी कोण योग्य किंवा अयोग्य होतं यावर…”, राहुल गांधींच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका!

“पालिकेत चांगले काम करणारे अधिकारी आहेत. त्यांच्या ९० दिवसांत ६ बदल्या करण्यात आल्या. काहींची तर २४ तासांत बदली केली गेली. प्रशासनात इतक्या तडकाफडली बदल्या होत नाही. एवढा गोंधळ का होतोय? कोणाच्या आदेशाने हे सुरु आहे?,” असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी केला आहे.

हेही वाचा : “अरे भाई आखिर कहना क्या चाहते हो?”, शरद पवारांचा उल्लेख करत फडणवीसांचा राहुल गांधींना सवाल, म्हणाले…

“मुंबईकरांच्या खिशातून शहराच्या सौंदर्यीकरणासाठी १७०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. हे सौंदर्यीकरण नेमकं कसं करण्यात येणार आहे. सौदर्यींकरण म्हणजे केवळ एलईडी लाईट लावणं नव्हे,” असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. ते शिवसेना भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.