मुंबईत शनिवारी ( २४ जून ) झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. याबद्दल पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. त्यावर ‘पाऊस झाला याचं स्वागत करा, पाणी साचलं ही तक्रार काय करता,’ अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली होती. या विधानावरून शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिवसेना भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी केलेलं हे विधान निर्लज्जपणाचं, नाकर्तेपणाचं आहे. भ्रष्टाचाराचा कोणता चेहरा असेल, तर हे खोके सरकार आहे. माजी महापौर आणि सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात काम केली आहेत. पण, कधीही कोणी मुंबईकरांना असे उत्तर दिलं नाही, की तक्रार काय करता, याचं स्वागत करा.”

हेही वाचा : “माझ्या त्या एका ट्वीटने सर्व विक्रम मोडले, आता तरी उद्धव ठाकरेंनी…”, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

“याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या वाहनांसाठी जेव्हा महामार्गावरील गाड्या थांबवल्या जातील. तेव्हा मुख्यमंत्री बोलतील, ‘तुम्ही गर्दीत अडकलाय, तक्रार काय करता. माझं स्वागत करा.’ एवढा निर्लज्जपणा, नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार मी आतापर्यंत मुंबईत कधीच पाहिला नाही,” असे आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

“गेली एक वर्ष मुंबईसह महाराष्ट्रात खोके सरकार आहे. मुंबई महापालिकेवर सरकारची हुकूमशाही चालू असताना वेगवेगळ्या कंत्राटात मोठे घोटाळे करण्यात आले. रस्त्यांचे घोटाळे मी समोर आणले. जे घोटाळे झाले, त्याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. नंतर चौकशी होऊन ज्यांना अटक करायची, ती आमचं सरकार आल्यावर करू,” असा इशारा आदित्य ठाकरेंना दिला आहे.

हेही वाचा : एकनाथ खडसेंनी घेतलेली भेट यशस्वी ठरली? पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत मिटकरींचं मोठं विधान

“खडी, सॅनिटरी पॅड, स्ट्रीट फर्निचर, सुशोभीकरणाच्या कामात घोटाळे करण्यात आले. शनिवारी मुंबईत पाऊस पडला. मुंबईकर पावसाचं नेहमीच स्वागत करतात. पण, मुंबईकरांनी गर्दीत अडकल्यावर, पाणी तुंबल्यानंतर ट्वीट केले. मात्र, मुंबई महापालिकेचे अधिकारी कुठेच दिसले नाहीत,” असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं.