वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहिल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. वंचित आणि शिवसेनेच्या युतीवरून भाजपाने थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. तसेच प्रकाश आंबेडकरांच्या या कृतीवर ठाकरे गटाची भूमिका काय असा सवाल भाजपाने उद्धव ठाकरेंना केला. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंना याबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

प्रकाश आंबेडकरांच्या औरंगजेब कबरीला भेट देऊन फुलं वाहण्याच्या कृतीविषयी विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, “मला आत्ताच माध्यमांकडून ही माहिती कळते आहे. मला त्याची माहिती घेऊ द्या आणि मग मी त्यावर बोलेन.”

rohit pawar on ajit pawar confession
Rohit Pawar : “ज्या पक्षाने कुटुंब फोडलं, त्यांना…”; अजित पवारांच्या ‘त्या’ कबुलीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Leader of Opposition in Lok Sabha and Congress MP Rahul Gandhi and party General Secretary Priyanka Gandhi Vadra
Ujjain Rape News: उज्जैनमधील उघड्यावर बलात्कार प्रकरण मानवतेला कलंक; राहुल गांधी, प्रियांका गांधींनी व्यक्त केला संताप
Where are the modern Indian political thinkers says Yogendra Yadav
आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत आहेत कुठे?
prakash ambedkar reaction on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावरून प्रकाश आंबडेकरांची टीका; म्हणाले, “भाजपा-आरएसएसला आजही…”
man attempt suicide by shooting himself due to a love affair
प्रेम प्रकरणातून डोक्यात गोळी झाडून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न – हडपसर भागातील घटना
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande : “संजय राऊतांचा बुद्ध्यांक कमी झालाय, त्यामुळे त्यांना…”; राज ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेला मनसेचं प्रत्युत्तर!
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : “अजित पवारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता पण..”, राखीच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं उत्तर चर्चेत

“शिंदे गटाने ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करावा”

शिंदे गटाने वर्धापन दिन साजरा करण्यापेक्षा ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करावा, असा खोचक सल्ला यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला. शिंदे गटाच्या गद्दारीची नोंद जगातील ३३ देशांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करून, त्यांनी किती निर्लज्जपणे गद्दारी केली होती, हे लोकांना दाखवून द्यावं, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी टीकास्र सोडलं.

“जगातील ३३ देशांनी त्यांच्या गद्दारीची नोंद घेतली”

दोन्ही गटाकडून वर्धापन दिनाच्या सुरू असलेल्या तयारीबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, “वर्धापन दिन आम्हीच साजरा करणार आहोत. दुसरीकडे ज्यांची हकालपट्टी झाली आहे. सगळीकडून ‘रिजेक्ट’ झालेला माल आमचा वर्धापन दिन कसा काय साजरा करू शकतो. त्यांनी (शिंदे गट) ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करावा. कारण जगातील ३३ देशांनी त्यांच्या गद्दारीची नोंद घेतली आहे. तोच दिवस त्यांनी साजरा करावा. त्यांनी किती निर्लज्जपणे गद्दारी केली, हे त्यांनी लोकांना दाखवून द्यावं.”

हेही वाचा : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली औरंगाजेबाच्या कबरीला भेट; म्हणाले, “५० वर्षे…”

रविवारी (१८ जून) वरळीत ठाकरे गटाचं राज्यव्यापी शिबीर आहे. या शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या शिबिराला उराज्यभरातून अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी दाखल होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे कामाची पाहणी करण्यासाठी वरळीत आले होते. यावेळी त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधला.