शिवसेनेनंतर आता काँग्रेसचेही नऊ आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याच्या आणि काँग्रेस फुटणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत पत्रकारांनी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर आदित्य ठाकरेंनी आपण आत्ता जर-तरवर बोलण्यापेक्षा देवाचं दर्शन घेऊ, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते शुक्रवारी (२ सप्टेंबर) मुंबईतील चंदनवाडीच्या गणपतीच्या दर्शनाला आले असताना माध्यमांशी बोलत होते.

काँग्रेसचे नऊ आमदार फुटणार असल्याच्या चर्चांवर प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, “जाऊ दे ना, आपण आत्ता जर-तर, अगर-मगरपेक्षा देवाचं दर्शन घेऊ आणि त्या आशीर्वादाने पुढे जाऊ.”

aaditya thackeray on rss bjp maharashtra election
Aaditya Thackeray: “मला RSS ला प्रश्न विचारायचा आहे की..”, आदित्य ठाकरेंचा सवाल; भाजपाच्या सत्तेतील वाट्याचं मांडलं गणित!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Raj Thackeray Criticized Sharad Pawar Again
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “शरद पवार हे तालुक्याचे नेते, जाणते राजे वगैरे..”
Sanjay Raut Ajit Pawar Gautam Adani
Gautam Adani : “गौतम अदाणींनी मविआ सरकार पाडलं, अजित पवारांची कबुली”, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
Ramdas Athawale on Raj Thackeray
‘मशि‍दीवरील भोंगे उतरणार नाहीत आणि राज ठाकरेंची सत्ताही कधी येणार नाही’, रामदास आठवलेंची खोचक टीका
devendra fadnavis criticisze uddhav thackeray by taking name of balasaheb thackeray
“अल्पसंख्याकांच्या मतांसाठी ठाकरेंनी बाळासाहेबांना … ” काय म्हणाले फडणवीस

“मी उत्सवाच्या दिवशी मी राजकारणावर बोलत नाही”

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दोन महिने झाले आहेत. या सरकारला किती गुण द्याल? असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, “मी उत्सवाच्या दिवशी मी राजकारणावर बोलत नाही. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे त्यावर काहीही बोलणार नाही.”

“उत्सवाच्या काळात कुणी राजकारण करत असेल तो बालिशपणा”

गणेशोत्सवातील राजकारणावरही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “उत्सवाच्या काळात जो कुणी राजकारण करत असेल तो बालिशपणा आहे. लोकांना हे सगळं दिसत आहे. एवढं राजकारण झालं तर लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल. कोविडच्या दोन वर्षांच्या काळानंतर आता सणवारांचा आनंद घेत आहेत. त्यामुळे राजकारण बाजूला ठेऊन लोकांना याचा आनंद घेऊ द्यावा.”

हेही वाचा : “अधिवेशनात सरकारकडून अनेक आश्वासनं, मात्र….”; आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका

“काही पक्षांकडून सगळीकडे राजकारण होत आहे”

“काही पक्षांकडून सगळीकडे राजकारण होत आहे. हे लोकांना दिसत आहे. ते कुणालाही आवडत नाही. आज आपण गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेत आहोत. हे सगळं त्यांच्या आशीर्वादावरच चाललं आहे,” असं ठाकरे यांनी म्हटलं.