मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा अखेरचा कसोटी सामना बघण्यासाठी अभिनेता आमीर खानने आपल्या नियोजित कार्यक्रमात गुरुवारी बदल केला. आमीर गुरुवारी सकाळपासूनच वानखेडेच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱया कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ बघतो आहे. आपल्या फलंदाजीने जगभरातील क्रिकेटप्रेमींना भुरळ घालणाऱया सचिन तेंडुलकरचा हा अखेरचा कसोटी सामना आहे. या सामन्यानंतर सचिन सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होतो आहे. या सामन्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी वानखेडेवर आली आहेत.
आमीर खानच्या आगामी धूम-३ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी यशराज फिल्म्स स्टूडिओमध्ये गुरुवारी दुपारी साडेचार वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, आमीर सचिनचा सामना बघण्यासाठी आल्यामुळे या कार्यक्रमाच्या वेळेमध्ये बदल करण्यात आली आहे. हा कार्यक्रम आता संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल.
पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ बाद झाल्यानंतर आमीर लगेचच स्टूडिओमधून निघून वानखेडेवर पोहोचला. सचिनच्या फलंदाजीचा आनंद लुटण्यासाठीच आमीर घाईगडबडीत पूर्वनियोजित कार्यक्रम सोडून वानखेडेवर आला.
सचिनसाठी आमीरने बदलला पूर्वनियोजित कार्यक्रम!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा अखेरचा कसोटी सामना बघण्यासाठी अभिनेता आमीर खानने आपल्या नियोजित कार्यक्रमात गुरुवारी बदल केला.
First published on: 14-11-2013 at 05:35 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir postpones dhoom 3 event to watch sachin bat