मुंबई : वरळी कोळीवाड्यातील तीन मजली इमारत धोकादायक बनल्यानंतर मुंबई महानगरपालिकेला आपला दवाखाना बंद करावा लागला होता. परिणामी, गेले तीन महिने वैद्यकीय उपचारांसाठी या परिसरातील रहिवाशांना दूरवर जावे लागत होते. मात्र महानगरपालिकेने वरळी कोळीवाड्यातच पुन्हा आपला दवाखाना सुरू केला असून आता सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत रहिवाशांना या दवाखान्यात आरोग्य सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे.

वरळी कोळीवाड्यातील महापालिकेचा दवाखाना असलेली इमारत धोकादायक ठरल्यामुळे ती पाडून टाकण्यात आली होती. त्यामुळे येथील नागरिकांना आरोग्य सुविधांबाबत गैरसोय होत होती. महानगरपालिकेने प्रभादेवी येथील महापालिकेच्या दवाखान्यात पर्यायी व्यवस्था केली होती. मात्र कोळीवाडा आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांना प्रभादेवीपर्यंत जावे लागत होते. बालकांचे लसीकरण, साथीचे आजारांवरील उपचारासाठी रहिवाशांना लांब जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांनी यासंदर्भात तक्रार केल्यानंतर महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभागाने वरळी कोळीवाड्यात वारस लेन येथे कंटेनरमध्ये एक तात्पुरता दवाखाना सुरू केला होता. मात्र तरीही तेथे पुरेशी आरोग्य सुविधा मिळत नव्हती. या दवाखान्यात अनेक गैरसोयी होत्या. मात्र महानगरपालिकेने आता हा दवाखाना अद्ययावत केला असून ‘आपला दवाखाना’च्या धर्तीवर येथे सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत आरोग्य सेवा मिळू शकणार आहे.

हेही वाचा – राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचार्‍यांचे मुंबईत राज्यव्यापी आंदोलन सुरू

हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर दिलेल्या आदेशावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधी हा दवाखाना केवळ सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेपुरताच होता. आता दवाखान्याची वेळ वाढवण्यात आली असून तेथे विविध आजारांच्या तपासण्या, औषधोपचार व रक्त तपासणी करून घेता येणार आहेत.