मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे आतापर्यंत ८४.३ टक्के काम पूर्ण झाले असून या मार्गिकेवरील पहिल्या टप्प्यातील आरे – बीकेसीदरम्यानचे ९१ टक्के, दुसऱ्या टप्प्यातील बीकेसी – कफ परेडदरम्यानचे ७९ टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्याचा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा (एमएमआरसी) मानस आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एमएमआरसी’ ‘मेट्रो ३’ मार्गिकेचे काम युद्धपातळीवर करीत आहे. या मार्गिकेचे काम यापूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे या मार्गिकेच्या कामाला विलंब झाला आहे. आता या मार्गिकेतील सर्व अडसर दूर करून कामाला वेग देण्यात आला आहे. या मार्गिकेतील पहिला टप्पा डिसेंबरमध्ये पूर्ण करण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर एमएमआरसीने ऑगस्टमध्ये पूर्ण झालेल्या कामाचा आढावा घेतला असून त्यानुसार ‘मेट्रो ३’  मार्गिकेचे एकूण ८४.३ टक्के काम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा >>> Mumbai Monsoon Update: दमदार पावसामुळे धरणांत भर

यामध्ये  बांधकाम (सिव्हिल वर्क) ९४.९ टक्के, स्थानकांचे ९२ टक्के, भुयारीकरण १०० टक्के, विविध यंत्रणांची ५७.९ टक्के, आरे कारशेडचे ७४.४ टक्के आणि  मुख्य मार्गिकेवरील रुळांचे ६७.४ टक्के काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार, सीएमआरएस चाचण्या कधी सुरू होणार याविषयी एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ही प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aarey bkc phase of metro 3 in service in december road work completed mumbai print news ysh