राज्य शासकीय योजनेच्या आरे दुधाच्या दरात १ डिसेंबरपासून लिटरमागे एक रुपया दरवाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वितरकांचे कमिशन सरसकट ४ रुपये करण्यात आले आहे.
सुधारित दराप्रमाणे सरसकट लिटरमागे आरे दुधाच्या दरात एक रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आरे भूषण टोण्ड दूध प्रति लिटर ३८ रुपये होते ते ३९ रुपये करण्यात आले. अध्र्या लिटरचा दर १९ रुपये होता, तो २० रुपये करण्यात आला. गाय टोण्ड दूध ३८ ऐवजी ३९ रुपयांना मिळेल. अध्र्या लिटरचा दर २० रुपये असेल. आरे शक्ती गाय दूध ४२ रुपये लिटर आहे, ते आता ४३ रुपये होईल. अर्धा लिटर दुधाला २२ ऐवजी २३ रुपये मोजावे लागतील. फूल क्रीम दूध ४७ रुपये लिटर होते, ते आता ४८ रुपये या दराने घ्यावे लागेल. अध्र्या लिटरचा दर २४ ऐवजी २५ रुपये असेल.