World Tribal Day 2024मुंबई : आरे वसाहतीत शुक्रवारी, ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन आणि ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास आरे पोलीस ठाण्याने मनाई केली आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी गेल्या वर्षी पोलिसांकडून देण्यात आलेले परवानगीचे पत्र दाखवण्याची मागणी पोलिसांनी केली होती. ते दाखवल्यानंतरही पोलिसांनी जागतिक आदिवासी दिन आणि ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यास मनाई केली आहे, असा आरोप कष्टकरी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

आरे वसाहतीत दरवर्षी जागतिक आदिवासी दिन आणि ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो. यंदाच्या कार्यक्रमासाठी संघटनेमार्फत २२ जुलै रोजी आरे पोलीस ठाण्याकडे कार्यकर्त्यांनी विनंती अर्ज सादर केला होता. मात्र, कार्यक्रमाला दोन दिवस शिल्लक असताना बुधवारी संघटनेच्या कार्यकर्त्यांना बोलावून पोलिसांनी शुक्रवारी आयोजित केलेला कार्यक्रम घेता येणार नाही असे सांगितले. गेल्या वर्षी दिलेली पोलीस परवानगी दाखवल्यानंतरही त्यांनी कार्यक्रमास परवानगी दिली नाही, असा आरोप संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Mehkars Circuit youth detained for providing false information about emergency alert system
‘मंदिरावर हल्ला झाला’! ‘त्या’ क्रमांकावर संदेश आल्याने पोलिसांची धावपळ, प्रत्यक्षात…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
police action on massage parlour misbehavior is going on in name of massage parlour
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल
BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
celebrations at durgadi fort in kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे जल्लोष

हेही वाचा >>>पवईतील जयभीम नगरातील झोपड्यांवरील कारवाई तपास साकीनाका पोलिसांकडे वर्ग का ? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुक्रवार, ९ ऑगस्ट रोजी आरे दुग्ध वसाहतीच्या गोरेगाव चेकनाका येथून आदिवासी बचाव यात्रा निघणार आहे. मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालणारे जंगल आदिवासी समाजाने राखले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे दुग्ध वसाहत, चित्रनगरी येथील जंगल परिसर, तसेच गोराईगाव, मढ आयलंड या परिसरातील कांदळवनांची काळजी आदिवासी समाजाकडून घेतली जात असून ते मोठ्या संख्येने येथे राहतात. असे असूनही गावठाणे मंजूर करणे, शेतजमिनींच्या समस्यांसह वन हक्क कायदा २००६ ची अंमलबजावणी, जातीच्या दाखल्यांसह अन्य मानवी सुविधा मिळाव्यात आदी आदिवासींच्या कित्येक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी ९ ऑगस्टला आदिवासी बचाव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Story img Loader