मौज प्रकाशन काव्यसंग्रह प्रकाशित करणार
‘गेले द्यायचे राहून’, ‘ती येते आणिक जाते’, ‘ये रे घना ये रे घना’, ‘समईच्या शुभ्र कळ्या’ अशी अवीट गोडीची गीते लिहिणारे कवी चिं. त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांच्या अप्रकाशित कविता आता लवकरच त्यांचे चाहते आणि साहित्यप्रेमींसाठी उपलब्ध होणार आहेत. मौज प्रकाशनाकडून हा काव्यसंग्रह प्रकाशित केला जाणार आहे.
चिं. त्र्यं. खानोलकर यांनी लिहिलेली ‘कुढत का राहायचं?’ ही पहिली कविता १९५३ मध्ये ‘वैनतेय’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर त्यांनी ‘एक मुद्रा’, ‘एक जुनाट जांभळ’, ‘उभी ही कोण?’, ‘पंगारा’ अशा अनेक कविता लिहून वाचकांवर गारूड केले. त्या काळात ‘सत्यकथा’ मासिकाचा साहित्य वर्तुळात मोठा दबदबा होता. ‘सत्यकथा’मध्ये लेखन प्रसिद्ध होणे ही प्रतिष्ठेची बाब होती. खानोलकर यांनी ‘वैनतेय’मध्ये प्रसिद्ध झालेली ‘उभी ही कोण?’ व ‘व्यर्थ मनोरथ’ या कविता ‘सत्यकथा’कडे पाठवल्या. ‘सत्यकथा’चे तेव्हाचे संपादक श्री. पु. भागवत यांना पत्रही लिहिले. परंतु कविता छापून आल्या नाहीत आणि भागवत यांच्याकडून काही उत्तरही आले नाही. याच मन:स्थितीत त्यांनी ‘शून्य शृंगारते आता होत हळदिवे’ आणि ‘मिळालेले मला खूळ’ या दोन कविता लिहिल्या. यातील ‘शून्य शृंगारते’ ही कविता जानेवारी १९५४ मध्ये ‘सत्यकथा’मध्ये ‘आरती प्रभू’ या नावाने प्रकाशित झाली. याच काळात त्यांनी पुढे अनेक कविता लिहिल्या. त्या सगळ्याच तेव्हा प्रकाशित झाल्या नाहीत. गेली अनेक वर्षे अप्रकाशित राहिलेला हा काव्यठेवा आता प्रकाशित होत आहे. त्यांच्या अप्रकाशित कविता वाचकांसमोर आल्याने वाचकांना पुन्हा त्यांची नव्याने ओळख होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिं. त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांच्या अप्रकाशित कवितांचा संग्रह येत्या सहा महिन्यांत आम्ही प्रकाशित करू. त्यांनी या सर्व कविता कोणत्या वर्षी लिहिल्या ते सध्या तरी सांगणे कठीण आहे. ५७ वर्षांपूर्वी ‘चिंत्र्यं’ यांचा ‘जोगवा’ हा पहिला काव्यसंग्रह मौज प्रकाशनाने प्रकाशित केला होता. आता तब्बल ४० वर्षांनंतर पुन्हा एकदा त्यांच्या अप्रकाशित कविता वाचकांपुढे येणार आहेत.
– संजय भागवत, मौज प्रकाशन गृह