सध्या एक नाव पुन्हा चर्चेत आलं आहे आणि ते म्हणजे अब्दुल करीम तेलगी. याची दोन महत्त्वाची कारणं आहेत. तेलगी प्रकरणात तुम्ही माझा राजीनामा का घेतला होतात? असा प्रश्न छगन भुजबळांनी शरद पवारांना विचारला हे एक कारण तर दुसरं कारण आहे ते म्हणजे स्कॅम २००३ ही अब्दुल करीम तेलगीच्या आयुष्यावर येणारी वेब सीरिज. अब्दुल करीम तेलगीने ८४ लाख रुपये एका रात्रीत टोपाझ या प्रसिद्ध बारमधल्या बारबालेवर उधळले आणि अचानक त्याची चर्चा सगळीकडे सुरु झाली आणि त्याच्या स्टँप पेपरचा घोटाळाही बाहेर पडला. हे सगळं कसं घडलं हे स्कॅम २००३ या पुस्तकाचे लेखक संजय सिंग यांनी सांगितलं आहे.

अब्दुल करीम तेलगीच्या आयुष्यावर संजय सिंग यांनी पुस्तक लिहिलं. २००१ मध्ये अब्दुल करीम तेलगीचा स्टँप पेपर घोटाळा उघडकीस आला. जी स्कॅम नावाची सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे ती सीरिज संजय सिंग यांच्या पुस्तकावरच आधारलेली आहे.

bse sensex declined by 236 points
सेन्सेक्सची २३६ अंशांनी माघार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल

हे पण वाचा- “मी त्यांना अटकेपासून वाचवलं”, छगन भुजबळांच्या आरोपांवर शरद पवारांचं उत्तर

संजय सिंग यांनी तेलगी विषयी काय म्हटलं आहे?

तेलगीचे आजोबा पणजोबा हे सगळे मूळचे उत्तर भारतातले. मात्र त्याच्या कुटुंबातले सदस्य नंतर कर्नाटकात आले. विजापूर जिल्ह्यात एक गाव होतं तेलगी नावाचं तिथून त्याला आडनाव मिळालं तेलगी. त्यानंतर बेळगावच्या खानापूरमध्येही त्याचं कुटुंब आलं. मात्र आडनाव तेलगी चिकटलं ते कायमचं. अब्दुल करीम तेलगीचे वडील रेल्वे स्टेशनवर काम करायचे. अब्दुल करीम तेलगी तरुण होता तेव्हाच त्याचे वडील वारले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अब्दुल करीम तेलगीच्या खांद्यावर येऊन पडली. अब्दुल दिवसा महाविद्यालयात जात असे आणि रात्री मिळेल ते काम करत असे असं संजय सिंग यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. फळविक्रेता म्हणून तेलगी काम करायचा. बेळगावात राहिला असला तरीही त्याचं मराठी खूप चांगलं होतं. हिंदी, मराठी, उर्दू आणि कन्नड या चार भाषा तेलगीला बोलता येत होत्या. तर इंग्रजी भाषा त्याला समजत होती.

नोकरी करणं हा तेलगीचा पिंड नव्हता

खानापूरहून तेलगी मुंबईत आला. मुंबईत तो नोकरी करु लागला होता. त्यानंतर गल्फमध्ये नोकरीसाठी गेला. मात्र त्याला नोकरी काही जमली नाही. नोकरी करणं त्याचा पिंडच नव्हता. तो मुंबईला परत आला तेव्हा त्याने एक ऑफिस उघडलं आणि नॉन इमिग्रेशनचे फेक स्टँप मारुन तो लोकाना गंडा घालू लागला. गल्फमध्ये जे मजूर जातात त्यांच्याबाबत तो असं करत असे. या प्रकरणात तेलगी तुरुंगात गेला. तुरुंगात त्याची भेट राम रतन सोनी नावाच्या माणसाशी झाली. सोनी शेअर मार्केटमध्ये घोटाळा केल्याच्या प्रकरणात तुरुंगात गेला होता. या दोघांची भेट झाली त्याने तेलगीला विविध कल्पना दिल्या. हजारो, लाखो रुपये तू कमवू शकतोस असं सोनीने तेलगीला सांगितलं. ज्यानंतर तेलगीने स्वतःच्या डोक्यात काय करायचं ते सगळं आखलं होतं. तेलगी जेव्हा तुरुंगाबाहेर आला तेव्हा तो वापरलेल्या स्टँप पेपवरची शाई केमिकलने काढून तो हे स्टँप पेपर परत विकत होता. स्टँप पेपरवर जो USED असा शिक्का होता तेलगी केमिकलने काढत असे आणि ते पेपर विकत असे. त्यात धोका जास्त होता आणि फायदा कमी होता. त्यानंतर त्याने बनावट स्टँप छापण्याचा आणि ते विकण्याचा विचार केला. त्यासाठी त्याने इंडियन सिक्युरीटी प्रेसमध्ये ओळख वाढवली.

हे पण वाचा- Scam 2003 : भरत जाधवसह ‘हे’ मराठमोळे कलाकार गाजवणार हिंदी सीरिज, ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

अनिल गोटेंच्या शिफारसीमुळे तेलगी झाला स्टँप व्हेंडर

आमदार अनिल गोटे यांनी तेलगीला स्टँप व्हेंडर म्हणून लायसन्स मिळावं अशी शिफारस केली होती. विलासराव देशमुख हे तेव्हा महसूल मंत्री होते. त्या काळात त्याला व्हेंडर म्हणून परवाना मिळाला. स्टँपचे व्यवहार कसे चालतात याचा तेलगीने पू्र्ण अभ्यास केला होता. नाशिकच्या इंडियन सिक्युरीटी प्रेसमध्ये त्याने गंगाप्रसाद म्हणून एक अधिकारी होते त्यांच्याशी ओळख वाढवली होती. तसंच तिथले कर्मचारीही तेलगीला ओळखत होते. या सगळ्यांना तेलगीने बरोबर घेतलं. त्यानंतर स्टँप पेपर प्रिंटिंगची मशीन लिलावात काढा असं त्यांना पटवलं. त्यासाठी त्या सगळ्यांना तेलगीने पैसेही खाऊ घातले. आता नियम असा आहे की ही मशीन विकता येते. पण त्याआधी तिचे संपूर्ण पार्ट वेगळे केले जातात आणि भंगार स्वरुपात ती विकली जाते. मात्र जो लिलाव झाला त्या लिलावानंतर अब्दुल करीम तेलगीला ही मशीन आहे तशी तेलगीला दिली. त्याचे पार्ट वेगळे केले नाहीत. त्यामुळे तेलगीच्या हाती स्टँप पेपर छापून देणारी मशीनच आली. ही मशीन तेलगी आपल्या ऑफिसमध्ये घेऊन आला. त्यानंतर यातून स्टँप पेपर छापण्यास सुरुवात केली. हे स्टँप इतक्या मोठ्या प्रमाणावर छापले गेले की महाराष्ट्र आणि कर्नाटकमधले गोडाऊन्स भरले होते असंही संजय सिंग यांनी सांगितलं.

अब्दुल करीम तेलगी बनावट स्टँपचा व्यवसाय कसा करत असे?

स्टँप पेपरचा घोटाळा हा १६ ते १७ राज्यांमध्ये होता. मात्र गोडाऊन महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत होते. तसंच बनावट स्टँप पेपर छापणारे तेलगीचे कर्मचारी वेगळे होते. तर त्याचं वितरण करण्यासाठी बीकॉम, एमकॉम झालेले लोक तेलगीने ठेवले होते. त्याच्याकडे त्या काळात साधारणतः २०० लोक होते. हे सगळे जण व्यवस्थित शिकले सवरलेले होते मात्र त्यांना कुणालाही आपण काय करतो आहोत ते समजलं नाही. त्याने एक स्पेशल रुल बुकही तयार केलं होतं. स्टँप पेपर तयार करण्याचं ते टुलकिट होतं. त्याच्याकडे जी मुलं वितरणासाठी होती त्यांना आपण काय करत आहोत अहे माहित नव्हतं. तेलगीने छापलेले स्टँप पेपर आणि सरकारने छापलेले स्टँप पेपर यात फरक करता येणं कठीण होतं. कारण तेलगी सरकारच्याच मशीन मधून पेपर छापत होता. १०० रुपयांचा स्टँप पेपर विकला की तेलगीला त्यात ७० ते ८० रुपये मिळायचे. बँका, ऑफिसेस इथे काम करणारे शिपाई यांना तेलगीसाठी काम करणाऱ्या माणसांनी आमच्याचकडून स्टँप पेपर न्यायचा तुला कमिशन देतो असं म्हणत जोडलं होतं. ज्याचा फायदा तेलगीला सर्वात जास्त प्रमाणात झाला असंही संजय सिंग यांनी सांगितलं. त्यामुळे बँकांकडे, लिगल फर्म्सकडे सगळ्यांकडे तेलगीचे स्टँप पेपर पसरले होते. त्याचा व्यवसाय प्रचंड वाढला.

टोपाझ बारमध्ये काय घडलं?

मुंबईतल्या ग्रँट रोड या ठिकाणी टोपाझ नावाचा बार आहे. त्यावेळी तो डान्स बार होता. महाराष्ट्रात तेव्हा डान्सबार सुरु होते. त्या बारमध्ये अब्दुल करीम तेलगीने एका रात्रीत ८४ लाख उडवले होते. डान्सबारमध्ये डुप्लिकेट अभिनेत्री असतात. त्यांच्यावर तो पैसे उडवत होता. एका रात्रीत ८४ लाख रुपये उडवले. इतके पैसे उडवल्यामुळे हा माणूस नेमका कोण? याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळेच अब्दुल करीम तेलगी हे नाव लोकांना कळलं. पोलिसांपर्यंत त्याचं नाव गेलं. त्यानंतर पुढे त्याचा घोटाळा उघडकीस आला. माझी तेलगीशी दोनदा भेट झाली होती. त्याला मी विचारलं होतं की डान्सबारमध्ये पैसे उधळले म्हणूनच तुमचा घोटाळा उघडकीस आला का? त्यावर त्याने हो असं उत्तर दिलं होतं असंही सिंग यांनी सांगितलं आहे.

Story img Loader