मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या बंडखोर गटातील नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आल्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीने अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन केलं. यावेळी अब्दुल सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सत्तारांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली. यात त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या. तर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी सत्तार यांच्यासहीत तीन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पाहा >> संतापजनक! कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना मुलाखतीदरम्यान शिवीगाळ; Video झाला Viral

Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं

सत्तार यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंदोलन केलं. या नरिमन पॉइण्ट येथील बंगल्याबाहेरच्या या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं महिलाही सहभागी झाल्या होत्या. यावेळेस बोलताना विद्या चव्हाण यांनी अब्दुल सत्तारांसारखा असंस्कृत मंत्री आपण यापूर्वी पाहिला नाही असं म्हटलं आहे. तसेच विद्या चव्हाण यांनी महिलांचा अवमान करणाऱ्या अब्दुल सत्तारांबरोबरच अन्य दोन नेत्यांनीही महिलांचा अवमान करणारं वक्तव्य केलं असून त्यांचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. “अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील आणि रविंद्र चव्हाण या तिघांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा,” असं विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत.

नक्की वाचा >> Abdul Sattar Abuse Supriya Sule: “…याचा अर्थ आम्ही शिव्या मुकाट्याने…”; आत्याला शिवी देणाऱ्या सत्तार यांना रोहित पवारांचा इशारा

गुलाबराव पाटील सुषमा अंधारेंना नटी वगैरे म्हणतात, रविंद्र चव्हाण बलात्काऱ्यांना सोडण्यासाठी भायखळा तुरुंगात बसून आहे. तर अब्दुल सत्तार सुसंस्कृत खासादाराबद्दल बोलतात, हे निंदनीय आहे, असं म्हणत विद्या चव्हाण यांनी निशेष नोंदवला. “हा महाराष्ट्र जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. अब्दुल सत्तारचा राजीनामा द्यावा. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांना मंत्रालयामध्ये बसू देणार नाही. यापूर्वीही आम्ही इशारा दिला होता,” असंही विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. तर राष्ट्रवादीच्या अन्य महिला पदाधिकाऱ्यांनी सत्तार यांच्या घराची तोडफोड कोणी केलेली नाही. तो कार्यकर्त्यांचा संताप आहे, असं म्हटलं आहे. तसेच, “अब्दुल सत्तारांना झोडून काढल्याशिवाय राहणार नाही”, “सत्तार यांनी पाया पडून सुप्रिया सुळेंची माफी मागणी,” असं महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

Story img Loader