मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे विश्वासू अभिजीत पानसे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या कार्यालयात आले. यानंतर ते मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचा प्रस्ताव घेऊन संजय राऊतांकडे आल्याच्या चर्चांना उधाण आलं. बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अभिजीत पानसे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (६ जुलै) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

तुम्ही मनसे-ठाकरे गटाच्या युतीचा प्रस्ताव संजय राऊतांकडे घेऊन आला होता का? या प्रश्नावर अभिजीत पानसे म्हणाले, “नाही. मनसे पक्षात मी इतक्या मोठ्या स्थानावर नाही. मी राज ठाकरेंचा कट्टर सैनिक आहे. त्यामुळे तशी वेळ येणार असेल तर मला माहिती नाही. युतीवर चर्चा करायची असेल, तर स्वतः राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यावर बोलतील.”

What Uddhav Thackeray Said About Raj Thackeray ?
Uddhav Thackeray : “राज ठाकरेंशी युती करणं शक्यच नाही, महाराष्ट्र द्रोही..”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
raj thackeray maharashtra vidhan sabha election 2024
Raj Thackeray: राज ठाकरेंनी सांगितली लोकसभेत भाजपाच्या पीछेहाटीची दोन कारणं; म्हणाले, “तेव्हा भाजपाचा एक उमेदवार…”!
Raj Thackeray On Ramesh Wanjale
Raj Thackeray : “रमेश वांजळे शेवटचं माझ्याशी बोलले”, राज ठाकरेंनी सांगितली आठवण; म्हणाले, “अनेक जण सोडून गेले, पण…”
raj thackeray on shivaji park light cut,
पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी शिवतीर्थावरील दीपोत्सवाचे कंदील काढल्याने राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, “हिंदुत्त्ववादी विचारांचे…”
Aditya Thackeray eknath shinde
Aditya Thackeray : “शिंदेंच्या दोन मंत्र्यांसह आठ जणांना परत यायचं होतं, पण…”, आदित्य ठाकरेंनी सांगितलं आठवडाभरापूर्वी ‘मातोश्री’वर काय घडलं
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”

हेही वाचा : लोकांकडून मतदान होत नाही तेव्हा राग येतो का? राज ठाकरे म्हणाले, “एवढ्या सगळ्या गोष्टी करूनही…”

“मला संजय राऊतांनीच राजकारणात आणलं होतं”

“मी माझ्या वैयक्तिक कामासाठी संजय राऊतांना भेटण्यासाठी सामनाच्या कार्यालयात आलो होतो. त्याचे वेगळे अर्थ लावू नका. या भेटीत राजकीय चर्चांचा काहीही संबंध नाही. माझे संजय राऊतांशी फार जुने संबंध आहेत. मला संजय राऊतांनीच राजकारणात आणलं होतं. त्यामुळे मला त्यांना काही कामानिमित्त भेटायचं होतं,” अशी माहिती अभिजीत पानसेंनी दिली.

हेही वाचा : केंद्र सरकार आणि देशभक्तीची प्रमाणपत्रं वाटणारे गप्प का? VIDEO पोस्ट करत राज ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले…

“मी संजय राऊतांना बऱ्याच दिवसांपासून भेटलो नव्हतो”

“मी संजय राऊतांना बऱ्याच दिवसांपासून भेटलो नव्हतो. मी त्यांना भेटायला घरी जाणार होतो, पण ते सामनात आहेत असं कळलं म्हणून इथं सामना कार्यालयात आलो,” असंही अभिजीत पानसे यांनी नमूद केलं.