मॉरिस नोरान्हा उर्फ मॉरिसभाईने केलेल्या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या हत्येनंतर दहिसर आणि बोरीवली भागात शोकाकुल वातावरण आहे. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव आज बोरिवली येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं. आज उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही घोसाळकर कुटुंबाची भेट घेतली. ज्यावेळी अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव घराच्या खाली आणण्यात आलं तेव्हा त्यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी टाहो फोडला. तर अभिषेक घोसाळकर यांची पत्नी आणि मुलगी या दोघींच्या डोळ्यातले अश्रूही थांबत नव्हते.

नेमकी घटना काय घडली?

मुंबईतल्या दहिसर भागात उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नाव्चाय स्वयंघोषित नेत्याने आणि सामाजिक कार्यकर्त्याने गुरुवारी रात्री त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर तातडीने अभिषेक घोसाळकर यांना करुणा रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अभिषेक घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर मॉरिसने स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली.

son kills mother Ghaziabad crime news
Son Kills Mother: वीस हजारांसाठी जन्मदात्या माऊलीचा खून; मित्रांनी आईचे हात धरले, मुलानं वीट घेतली आणि…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
krushna abhishek govinda feud ended
अखेर ७ वर्षांनी वाद मिटला! जखमी गोविंदाची भाचा कृष्णा अभिषेकने घेतली भेट; म्हणाला, “मामींना भेटण्याची भीती…”
man hit his father on head with an iron rod after arguments in amravati
अमरावती : रागातून उद्भवला वाद; मुलाने लोखंडी बत्त्याने वडिलांच्या डोक्यावर…
political twist in the suicide of a professional DJ
भंडारा : डीजे व्यावसायिकाच्या आत्महत्येला राजकीय वळण
boyfriend died by heart attack
“तिला वाचवा, ती मरेल”, एवढं बोलून प्रियकर कोसळला; रक्ताच्या थारोळ्यात प्रेयसीला पाहून प्रियकराचा ओढवला मृत्यू!
Mahesh Landge, Wagheshwar Maharaj temple,
‘भोसरी माझी आई, तर चऱ्होली मावशी’; महेश लांडगे यांनी दोन माजी महापौरांसह ठोकला शड्डू
Salman Khan News 25 Lakh Contract to Hit Him AK 47 From Pak Said Police Chargesheet
Salman Khan : “सलमान खानला मारण्यासाठी २५ लाखांची सुपारी आणि…”, बिश्नोई गँगचा कट काय होता?

हे पण वाचा- “…आणि मॉरिसने अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या”, प्रत्यक्षदर्शी लालचंद पाल यांनी सांगितला थरार

उद्धव ठाकरेंनी केलं सांत्वन

उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक असलेल्या विनोद घोसाळकर यांच्या मुलाची आणि शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची अशी धक्कादायक हत्या झाल्यानंतर, उद्धव ठाकरे हे सहकुटुंब घोसाळकरांच्या घरी पोहोचले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते हे घोसाळकरांच्या निवासस्थानच्या समोर असलेल्या एका हॉलमध्ये थांबले. उद्धव ठाकरेंनी पोलीस उपायुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा करुन, संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.

हे पण वाचा- Abhishek Ghosalkar Shot Dead: शिवसेनेचा कार्यकर्ता ते तडफदार नगरसेवक, गोळीबारात मृत्यू झालेले अभिषेक घोसाळकर कोण होते?

मॉरिसने गोळ्या झाडून अभिषेक घोसाळकरांना संपवलं

अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हदरम्यान हत्या झाली. मुंबईतील दहिसर इथले उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या स्वयंघोषित नेत्याने गुरुवारी ८ फेब्रुवारी रात्री ८ च्या सुमारास हा गोळीबार केला. यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. फेसबुक लाईव्हदरम्यान हा सगळा थरार रंगला.मॉरिस नोरोन्हा याच्यावर याआधीही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. हत्या, अत्याचार आणि फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. बलात्कार प्रकरणात गोवल्याचा राग मॉरिसला होता. त्यातूनच अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्याचा आरोप आहे.