महिला वाहकाला मारहाण करून तिचा विनयभंग करणारा आरोपी अभिषेक सिंग याला कल्याण न्यायालयाने ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे वाहकाला मारहाण झाली त्यावेळी या बसमधून अभिषेकची बहीण प्रियंकाही प्रवास करीत होती. प्रियंकाला महिला वाहकाने शिवीगाळ केली म्हणून आपण वाहकास मारहाण केली, असा जवाब अभिषेकने पोलिसांकडे नोंदविला असून त्याच्या जबाबातील सत्यता पोलीस तपासत आहेत.

Story img Loader