मुंबई : काळाचौकी येथील अभ्युदयनगर वसाहतीच्या पुनर्विकासासाठी कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपमेंट एजन्सी (सी अॅण्ड डी) अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. विकासकाच्या नियुक्तीसाठी म्हाडाचे मुंबई मंडळ बुधवारी निविदा प्रसिद्ध करणार आहे. त्यानुसार अभ्युदय नगरातील रहिवाशांना किमान ६३५ चौरस फुटांची घरे मिळतील. शिवाय मुंबई मंडळाला ४० हजार चौरस मीटर क्षेत्रफळ आणि सुमारे ८०० कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> Dharavi Assembly constituency : धारावीचा उमेदवार कोण? उद्धव ठाकरे काँग्रेसकडून मतदारसंघ मागणार?

AI shield to protect against cyber criminals
सायबर गुन्हेगारांपासून बचावासाठी ‘एआय’ची ढाल
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Contract recruitment continues through service provider company in government various departments
कंत्राटी भरतीचा पुन्हा धडाका, तीन वर्षे नियमित भरतीची शक्यता धूसर
Kalwa-Airoli Project, Mumbai, Kalwa-Airoli,
मुंबई : साडेसात वर्षांत कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचे केवळ ४६ टक्के काम पूर्ण
urban development department grant 55 crore fund for development works in dombivli
डोंबिवलीतील विकास कामांसाठी नगरविकास विभागाकडून ५५ कोटीचा निधी, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रयत्न
Navi Mumbai is Semiconductor Hub start on the occasion of inauguration of Semiconductor Project
नवी मुंबई सेमीकंडक्टरचे हब, सेमीकंडक्टर प्रकल्प उद्घाटनाच्या निमित्ताने मुहूर्तमेढ
construction of illegal building near kdmc h ward office
कडोंमपाच्या ह प्रभाग कार्यालयाजवळ बेकायदा इमारतीची उभारणी; सामासिक अंतर न सोडल्याने परिसरातील सोसायटीतील रहिवासी अस्वस्थ
Executive Director of Konkan Irrigation Development Corporation approved two year plan to supply 500 million liters of daily water
भिरा’च्या पाणी प्रस्तावाला गती,शासन मंजुरीनंतर पनवेल महापालिकेचा ३४०० कोटींचा खर्च

एकूण ३३ एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावर अभ्युदयनगर वसाहत उभी असून या वसाहतीत ४९ इमारतींचा समावेश आहे. या इमारतींत ३,३५० निवासी गाळे आहेत. या इमारतींची दुरवस्था झाली असून गेली अनेक वर्षे पुनर्विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र निरनिराळ्या कारणांमुळे या वसाहतीचा पुनर्विकास मार्गी लागू शकलेला नाही. अखेर या वसाहतीच्या पुनर्विकासाची जबाबदारी मुंबई मंडळाकडे आली आहे. त्यानंतर मंडळाने पुढील सर्व कार्यवाही करून मोतीलाल नगरच्या धर्तीवर अभ्युदय नगरचा पुनर्विकास ‘सी ॲण्ड डी’ प्रारूपानुसार करण्याचा निर्णय घेतला. व्यवहार्यतेनुसार रहिवाशांना ४९९ चौरस फुटांचे घर देण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. त्यानुसारच ‘सी ॲण्ड डी’साठी निविदा मागविण्याची तयारी मंडळाने सुरू केली. मात्र, त्याच दरम्यान अभ्युदयनगरमधील रहिवाशांनी ४९९ चौरस फुटांच्या घराच्या निर्णयावर आक्षेप घेतला. ७४० चौरस फुटांचे घर देण्याची मागणी रहिवाशांनी केली होती. परिणामी, निविदा प्रक्रिया लांबणीवर गेली. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. रहिवाशांना किमान ६३५ चौरस फूट आणि कमाल ६७८ चौरस फुटांचे घर मिळेल अशा प्रकारे निविदा काढण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार ‘सी अँड डी’ प्रारूपानुसार बुधवारी निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>> शिर्डी येथील साईबाबा संस्थानला मिळणाऱ्या निनावी देणग्या प्राप्तिकरमुक्त, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

घरांची संख्या गुलदस्त्यात या निविदेत रहिवाशांना किमान ६३५ चौरस फूट आणि अधिकाधिक ६७८ चौरस फुटांचे घर देण्याची अट समाविष्ट करण्यात येईल. अधिक क्षेत्रफळ देणाऱ्या निविदाकाराची विकासक म्हणून नियुक्ती केली जाईल. दरम्यान, मुंबई मंडळाला या पुनर्विकासातून ४० हजार चौरस मीटर इतके क्षेत्रफळ उपलब्ध होईल. यात नेमकी किती घरे असतील, हे अद्याप स्पष्ट झाले नाही, असे मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.