लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एक लाख २० हजारांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) सहाय्यक संचालकासह चौघांना सोमवारी अटक केली. याप्रकरणी एका कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी मंगळवारी सीबीआयने टाकलेल्या छाप्यात सुमारे दीड कोटींची रोख, सोन्याच्या दोन लगड, लॅपटॉप अशा वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
सहाय्यक संचालक (तांत्रिक) अमोल जगताप, खासगी कंपनीचे संचालक विकास भारद्वाज, वरिष्ठ व्यवस्थापक हर्षल चौगुले व कंपनीचा प्रतिनिधी गुरूनाथ दुबूले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी प्रलंबित बिले मंजूर करण्याच्या बदल्यात लाच घेत असल्याचा आरोप आहे. सीबीआयने सापळा रचून खासगी कंपनीच्या प्रतिनिधींमार्फत एक लाख २० हजाराची लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली चौघांना अटक केली होती. याप्रकरणी शोध मोहिमेत एक कोटी ४२ लाख ७० हजार रुपये सापडले.
आणखी वाचा-पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलचा नवा विक्रम; एका दिवसात ३,७३७ प्रवाशांनी लोकल पास काढला
याशिवाय सोन्याच्या दोन लगड, लॅपटॉप व संशयीत कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ठाण्यातील खासगी कंपनीच्या कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाच्या घरी ही रोख सापडली आहे. यापूर्वी याप्रकरणी सीबीआयने आरोपींच्या कार्यालयात व निवासी परिसरात झडती घेण्यात आली असून त्यात ३७ लाख ३० हजार रुपयांची रोख, ४५ ग्रॅम सोने व विविध स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर दोषी कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी आतापर्यंत एकूण एक कोटी ८० लाखांची रोख जप्त करण्यात आली आहे.