सात वर्षांपूर्वी चाहत्याला मारलेली थप्पड अभिनेता गोविंदा याला भोवली आहे. या थप्पड प्रकरणी गोविंदाने सदर चाहत्याची माफी मागावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सध्याोाध्यमांपासून दूर असलेल्या गोविंदाने मंगळवारी निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो, असे गोविंदाने सांगितले असले तरी न्यायालयाच्या आदेशानुसार त्या चाहत्याची माफी मागायची की नाही, याचा निर्णय घेतला नसल्याचे त्याने स्पष्ट केले.
चित्रपटाच्या सेटवर गोविंदाने संतोष रायला थप्पड मारली होती. या कृतीने दुखावलेल्या संतोषने या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली होती. अभिनेता म्हणून गोविंदा सगळ्यांना आवडतो, पण म्हणून पडद्यावर तो जसे वागतो तसे त्याने प्रत्यक्ष आयुष्यात वागू नये, अशी तंबी देत न्यायालयाने दिली होती.