काही विभागांतील कचरा वाहून नेणारे कॉम्पॅक्टर्स भाडे तत्वावर घेण्याबाबतचे १६८ कोटी रुपयांचे कंत्राट समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांची भागिदारी असलेल्या कंपनीला देऊन पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने समाजवादी पार्टीशी असलेल्या छुप्या युतीचे दर्शन घडविले.
पालिकेच्या एच-पूर्व, के-पश्चिम आणि के-पूर्व परिसरातील कचरा वाहून नेण्यासाठी लहान-मोठे कॉम्पॅक्टर्स आणि छोटी बंदिस्त वाहने भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या एस. के. एन्टरप्रायझेस, ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट सेल आणि अबू आझमी यांच्या गल्फ हॉटेल यांची संयुक्त भागिदारी असलेल्या एम. के. एन्टरप्रायझेस (जे.व्ही.) या कंपनीची निविदा लघुत्तम असल्यामुळे या कंपनीला कंत्राट देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. तसेच त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी सादर करण्यात आला होता. आमदार-खासदारांच्या कंपन्यांना काम देऊ नये अन्यथा या कंपन्यांनी कामात कुचराई केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करताना पालिका अधिकाऱ्यांवर दबाव येण्याची शक्यता आहे. परिणामी अशा कंपन्यांविरुद्ध कारवाई करताना अडथळे येतील. त्यामुळे आमदार- खासदारांच्या कंपन्यांना काम देऊ नये, असा आक्षेप मनसेचे गटनेते दिलीप लांडे आणि नगरसेवक संदीप देशपांडे यांनी घेतला. शिवसेनेची समाजवादी पार्टीशी छुपी युती असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा