मुंबई : नशेची पावडर देऊन १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वांद्रे येथील निर्मल नगर पोलिसांनी चौघांविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्ह दाखला केला आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांचे निधन झाले असून त्याचा गैरफायदा घेऊन आरोपी गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर अत्याचार करीत असल्याचा आरोप आहे.
पीडित मुलगी १७ वर्षांची आहे. पीडित मुलीच्या आई – वडिलांचे निधन झाले होते. तिचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीनेच १३ ऑगस्ट रोजी तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी तिने पोलिसांकडे तक्रार केल्यांनतर १५ वर्षांची असल्यापासून तीन तरुणांनीही तिच्यावर अत्याचार केल्याचे पोलिसांना सांगितले. इतर तीन आरोपींनी पीडित मुलीला नशेची पाडर देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला होता. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.