बदलापूर स्थानकाजवळील सायडिंगला उभ्या असलेल्या लोकल गाडीला मंगळवारी दुपारी एकच्या दरम्यान अचानक आग लागली. गाडी रिकामी असल्यानेकोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीमुळे कर्जतकडून कल्याणच्या दिशेने निघालेल्या गाडय़ांची वाहतुक सुमारे अर्धा तास उशीराने होत होती.
गेल्या एक महिन्यापासून ही लोकल बदलापूर येथील कर्जत दिशेकडील साईड ट्रॅकवर उभी करण्यात आली होती. मंगळवारी दुपारी या लोकलच्या एका डब्याने अचानक पेट घेतला. आगीची माहिती मिळताच बदलापूर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अध्र्या तासाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी तोपर्यंत लोकलचे दोन डब्बे जळून खाक झाले होते. भस्मसात झालेल्या लोकल डब्यांमध्ये प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या दोन डब्यांचा समावेश आहे, अशी माहिती बदलापूर अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत सोनावणे यांनी दिली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. आगीमुळे बदलापूर ते कर्जत मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. सुमारे अर्धा तास या भागातील वाहतुक ठप्प झाली होती. आग नियंत्रणात आल्यानंतर रेल्वे सेवा पुर्वपदावर आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा