वातानुकुलित लोकलने प्रवास करणाऱ्यांना रेल्वेने तात्पुरता दिलासा दिला आहे. रेल्वे प्रशासनाने मे अखेरपर्यंत वातानुकुलित रेल्वेच्या तिकीट दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

दीड वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वे मार्गावर वातानुकुलित लोकल सेवा सुरू करण्यात आली होती. त्यावेळी पहिल्या सहा महिन्यांसाठी वातानुकुलित रेल्वेच्या तिकीटांच्या दरात सवलत देण्यात आली होती. कमी अंतराच्या प्रवासासाठी तिकीटाचा दर 60 रूपये आणि जास्त अंतराच्या प्रवासासाठी 205 रूपये भाडे आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच सहा महिन्यांनंतर भाडेवाढ प्रस्तावित होती. परंतु त्यानंतही भाडेवाढ करण्यात आली नाही.

https://twitter.com/WesternRly/status/1125770509814095872

डिसेंबर 2018 मध्ये वातानुकुलित रेल्वेच्या तिकीट दरात भाडेवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु त्यावेळीही त्याला 4 महिन्यांसाठी स्थगिती देण्यात आली. त्यानुसार 24 मे रोजी ही भाडेवाढ अपेक्षित होती. पंरतु या भाडेवाढीला पुन्हा एकदा 31 मे पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत केवळ वातानुकुलित रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेच्या तिजोरीत 19 कोटी रूपयांचा महसूल जमा झाला होता. तर केवळ एप्रिल महिन्यात वातानुकुलित रेल्वेने 1 कोटी 84 लाखांचा महसूल रेल्वेला मिळवून दिला आहे. दरम्यान, वातानुकुलित रेल्वेच्या वाढीव थांब्यांमुळे महसूलात मोठी वाढ झाली आहे.

Story img Loader