मुंबई : एखाद्या शाखेतील किंवा विषयातील पदवी मिळवण्यासाठी आवश्यक औपचारिक पात्रतेचे निकष मोडीत काढून मागेल त्याला पदवी अशी लवचिकता उच्च शिक्षणात येत्या काळात अमलात येणार असून कौशल्ये, अनौपचारिक शिक्षण, एखाद्या श्रेत्रातील कामाचा अनुभव यांच्या आधारेही पदवी प्रदान करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतला आहे. त्याचा आराखडा सूचना आणि आक्षेपांसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उच्च शिक्षण पूर्व प्रमाणीकरण (आरपीएल) आराखडा आयोगाने प्रसिद्ध केला आहे. त्या आराखड्यानुसार येत्या काळात कामाचा अनुभव, आत्मसात केलेले कौशल्य, स्व अध्ययनाच्या माध्यमातून एखाद्या विषयाचे शिक्षण, एखाद्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालील अनौपचारिक शिक्षण, गुरूशिष्य परंपरेनुसार शिक्षण यांच्या आधारे पदवी मिळण्याची मागणी विद्यार्थी करू शकतील. आयोगाने यापूर्वीच निश्चित केलेले अध्ययन निष्पत्ती निकष आणि पदवीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्याचा कामाचा अनुभव, कौशल्ये यांचा ताळमेळ बसत (पान ५ वर) (पान १ वरून) असल्यास अशा विद्यार्थ्याला पदवी प्रदान करण्यात येईल. अनुभवाचे मूल्यांकन, कौशल्य, कामाचे स्वरूप, सद्यास्थितीत लागू असलेला अभ्यासक्रम या आधारे पदवी प्रदान करण्याबाबत स्वतंत्र समिती निर्णय घेईल. पदवी देण्याइतके श्रेयांक नसल्यास पदवी अभ्यासक्रमातील काही विषयांत सवलत देण्यात येईल. पुढील सत्रापासून देशातील काही उच्चशिक्षण संस्थांमध्ये या नव्या रचनेची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा : माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव

किमान पात्रतेबाबत संदिग्धता

सध्या पदवी शिक्षणासाठी किमान बारावी उत्तीर्ण अशी पात्रता आहे. मात्र नव्या लवचिक धोरणानुसार ती कायम राहणार का किंवा किमान पात्रता काय याबाबत संदिग्धता आहे. नव्या आराखड्याची, त्यामागील हेतूची ओळख करून देताना औपचारिक किमान पात्रता नसल्यास परंतू अनुभव आणि कौशल्य असल्यास पदवी मिळू शकेल अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे.

काय होणार?

कामाच्या अनुभवाच्या आधारे पदवी मिळण्यासाठी अर्ज करता येईल. उदाहरणार्थ एखाद्या दुकानदाराचा कामाचा अनेक वर्षांचा अनुभव असेल तर त्याला व्यवस्थापन शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी (एमबीए) अर्ज करता येईल. त्यासाठी कामाचा अनुभव, कौशल्ये त्याला सिद्ध करावी लागतील. प्रमाणपत्र किंवा पदविकाधारक परिचारिका तिच्या कामाच्या अनुभवाच्या आधारे परिचर्या क्षेत्रातील पदवीसाठी अर्ज करू शकेल. एखादा मूर्तीकार त्याच्या कौशल्याच्या आधारे पदवीसाठी अर्ज करू शकेल किंवा पदवीसाठी आवश्यक काही मोजक्याच विषयांची परीक्षा देऊन पदवी मिळवू शकेल.

हेही वाचा : महाराष्ट्रातून ओडिशात सोडलेली वाघीण झारखंडमध्ये

पदवी कोण देणार?

पूर्व कौशल्ये किंवा कामाच्या अनुभवाच्या आधारे पदवीसाठी अलेल्या अर्जांवर निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येईल किंवा स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. अर्जांची छाननी करून उमेदवार पदवीसाठी पात्र आहे का याचा निर्णय समिती घेईल. आवश्यक असल्यास उमेदवाराची लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Academic degree given on the basis of work experience css