मुंबई : कैद्याच्या भावाकडून १० हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहातील वरिष्ठ तुरुंग अधिकारी निवृत्ती कन्नेवाड व पोलीस शिपाई राहुल गरड यांना अटक केली. यापूर्वीही तक्रारदार यांच्याकडून आरोपी गुगल पेद्वारे रक्कम घेतल्याचा आरोपी तक्रारीत करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी सद्या एसीबी कोठडीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अनैतिक संबंधांची माहिती पत्नीला देण्याची भीती घालून ३७ लाखांची खंडणी, तीन महिलांविरोधात गुन्हा

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा भाऊ हा २०१८ पासून नवी मुंबईतील तळोजा मध्यवती कारागृहात न्यायालयीन कोठडीत बंदी आहे. तक्रारदार यांच्या भावाने 11 डिसेंबर रोजी तक्रारदार यांना दूरध्वनी करून तुरूंग अधिकारी कन्नेवाड हे पैसे मागत असून पैसे न दिल्यामुळे त्याला खूप त्रास देत आहेत, असे सांगितले. तसेच १३ डिसेंबरला सत्र न्यायालयात घेऊन जाणार आहेत, त्यापुर्वी तुरूंग अधिकारी कन्नेवाड व बाबाला (कारागृह अंमलदार राहूल गरड) यांना एक हजार रुपये दयायचे आहेत, असे सांगितले. त्यानंतर एका मोबाईल क्रमांकावरून तक्रारदार यांना १२ डिसेंबरला पैशांबाबत व्हॉट्सअप संदेश व दूरध्वनी आला. त्यानंतर त्या मोबाईल क्रमांकावर तक्रारदार यांनी एक हजार रुपये गुगल पेद्वारे पाठवले. त्यानंतर त्याचा स्क्रीटशॉट काढून पाठवला. त्यानंतर १३ डिसेंबरला तक्रारदाराला त्या मोबाईल क्रमांकावरून ओके असा संदेश आला व पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली.

हेही वाचा >>> अश्लील चाळे करणाऱ्याला आग्रा येथून अटक

तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे १३ डिसेंबरला त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबईने यांनी याबाबत पडताळणी केली. त्यावेळी आरोपी पोलीस शिपाई राहुल गरड यांनी १० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शनिवारी लाचलुचत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात राहुल गरड याने १० हजार रुपयांची लाच स्वीकारली. तसेच त्याबाबत वरिष्ठ तुरुंग अधिकारी निवृत्ती कन्नेवाडच्यांच्यास संपर्क साधला. त्यानंतर कन्नेवाड यांनी गरड यांच्या यांच्याकडून १० हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले. त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. एसीबीने दोघांनाही अटक केली असून त्यांना याप्रकरणी १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acb arrested senior jail officer and police constable of taloja jail while taking rs 10000 bribe mumbai print news zws