राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाई पाठोपाठ (ईडी) आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही (एसीबी) सोमवारी भुजबळांवर आरोपपत्र दाखल केले. मुंबई विद्यापीठ सेंट्रल लायब्ररीतील घोटाळाप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. १७ हजार ४०० पानांच्या या आरोपपत्रात छगन भुजबळ आणि त्यांचे लेखापरीक्षक (सीए) रवींद्र सावंत यांच्यासह सातजणांच्या नावांचा समावेश आहे.
महाराष्ट्र सदनसह अन्य आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये सध्या अटकेत असलेले छगन भुजबळ सध्या आर्थर रोड कारागृहातील ‘अंडासेल’मध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी होळीचा सण कुटुंबीयांसोबत साजरा करू द्यावा, या मागणीसाठी भुजबळांनी बुधवारी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. तसेच तात्पुरता जामीन देण्याची विनंती केली होती. मात्र, विशेष न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली होती.
‘एसीबी’कडून छगन भुजबळांवर आरोपपत्र दाखल
मुंबई विद्यापीठ सेंट्रल लायब्ररीतील घोटाळाप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-03-2016 at 14:03 IST
TOPICSईडीEDछगन भुजबळChhagan Bhujbalमहाराष्ट्र सदनMaharashtra Sadanराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPस्कॅमScam
+ 1 More
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acb has today filed a chargesheet in the spl court in central library case against mr chagan bhujbal