निविदा न मागविता खरेदी केल्याच्या घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिला व बालकल्याण विभागाकडून माहिती मागविली आहे. ही माहिती आल्यानंतरच पुढील चौकशी केली जाणार असल्याचे एसीबीतील सूत्रांनी सांगितले. या संदर्भात महिला व बालकल्याण विभागाच्या प्रधान सचिवांना बुधवारी सायंकाळी पत्र पाठविण्यात आले आहे.
चिक्की तसेच इतर साहित्यापोटी २०६ कोटींची खरेदी निविदा न मागविता करताना घोटाळा झाल्याचा आरोप महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने एसीबीकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर एसीबीने महिला व बालकल्याण विभागाला पत्र पाठवून माहिती मागविली आहे.
या कथित खरेदीप्रकरणी माहिती मागविणारे एसीबीचे पत्र आम्हाला मिळाले आहे. या पत्रात मागितलेल्या माहितीनुसार सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. हा अहवाल मुख्यमंत्री व मुख्य सचिवांना उद्यापर्यंत सादर केला जाईल आणि त्यानंतर तो तो एसीबीपर्यंत पाठविला जाईल, असे या विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा