गोरेगाव बस आगारात गुरुवारी मध्यरात्री बसगाडय़ांची साफसफाई करीत असताना एका बसचालकाने बस मागे घेतली. त्यात साफसफाई करणारे किरण सुसविरकर हे कर्मचारी जबर जखमी झाले. त्यांना तातडीने भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिथे गेल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. बस मागे घेणारा बसचालक प्रकाश साळुंखे याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. हलगर्जीमुळे मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.    

Story img Loader