वांद्रे वरळी सीलिंकवर रविवारी रात्री झालेल्या दोन अपघातात एकजण ठार तर एका पोलीस शिपायासह पाचजण जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वांद्रे सी-लिंकवर भरधाव सुमोने पुढे असलेल्या आय २० या कारला धडक दिली. यामुळे आय-२० ही कार दुभाजकाला जाऊन धडकली. यामध्ये अंकित शांताराम फोंडके (२८) यांचा जागीच मृत्यू झाला, तर विलास नवले (२३), निखील धोत्रे (२२), भावेन पटेल (२३), अंकित पेडणेकर (२४) हे चारजण जखमी झाले. या प्रकरणी सुमोकार चालक संदीप नागवेकर याला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. या अपघाताचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या वांद्रा पोलीस वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई संजय मोरे (३५) यांना भरधाव वेगाने येणाऱ्या लान्सर कारने धडक दिल्याने मोरेदेखील अपघातात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बाँबे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारचालक धीरड संसारे (२२) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक झाली आहे.