मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्येएका कारचा चुराडा झाला आहे. कंटेनर आणि कारमध्ये धडक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. शिलाटणे गावाजवळ ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना कारचालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं. शिलाटणे गावाजवल महामार्गावर ही कार दुभाजक ओलांडून पलीकडच्या दिशेला गेली. कारचा वेग इतका होता की समोरून येणाऱ्या कंटेनरच्या खाली ही कार घुसली.

Accident
Accident : दाट धुक्याने घात केला! १२ प्रवासी असलेली क्रूझर कार कोसळळी कालव्यात; १० जण बेपत्ता
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Car, ST buses hit, flyover , Nagpur,
नागपुरात उड्डाणपुलाखाली कार, एसटी बसेस परस्परांवर धडकल्या, ९ प्रवासी जखमी
Buldhana, Speeding car hits a vehicle, car ,
बुलढाणा : भरधाव कार वाहनावर आदळली, एक जागीच ठार, दोघे गंभीर…
Navi Mumbai year 2024 road accidents navi mumbai police
नवी मुंबई : रस्ते अपघातांमध्ये वर्षभरात २८७ मृत
Container Truck Collides With Multiple Vehicles near the khambatki tunnel
खंबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकरसह तीन मोटारींचा अपघात; जिवीतहानी टळली, मोटारीचे मोठे नुकसान
Three injured as speeding car hit 5 vehicles
मोटारीची पाच वाहनांना धडक; सांगलीजवळ तिघे जखमी
Woman killed five injured in horrific accident on Samruddhi Highway Nagpur news
समृद्धी महामार्ग: दुभाजकाला धडकून कारचे दोन तुकडे; महिला ठार, पाच जखमी

या अपघाताचा तडाखा इतका भीषण होता की यामध्ये कारचा पूर्णपणे चुराडा झाला. यात कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

अपघातग्रस्त कारचा क्रमांक

दरम्यान, मृत प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नसून त्यासंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलीस अधिकचा तपास करत आहेत, अशी माहिती लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली आहे.

Story img Loader