मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातामुळे या मार्गावरील मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. खोपोलीच्या फुडमॉलजवळ साधारण तासाभरापूर्वी हा अपघात घडला.  या मार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सिमेंटच्या ट्रकला मागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेत एका  चालकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या चार मार्गिकांपैकी तीन मार्गिका बंद करण्यात आल्या आहेत. मुंबईला येण्यासाठी केवळ एक मार्गिकाच उपलब्ध असल्याने सध्या या मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

Story img Loader