मुंबईतील सायन-माटुंगा महामार्गावर गुरूवारी सकाळी झालेल्या अपघातात बेस्ट बसचा चालक जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली. माटुंग्याच्या किंग्जसर्कल उड्डाणपुलानजीक हा अपघात झाला. सकाळी ९.२५च्या सुमारास एका कंटेनरने येथील उंची नियंत्रक कमानीला धडक दिली. त्यानंतर ही कमान थेट रस्त्यावरून जाणाऱ्या बेस्ट बसच्या पुढच्या भागावर जाऊन आदळली. त्यामुळे बसचा चालक जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे महामार्गावर वाहतुकीचा मोठ्याप्रमाणावर खोळंबा झाला होता. सायनकडून दक्षिण मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. तर, सायनकडून विक्रोळीच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीमध्येही मोठ्याप्रमाणावर व्यत्यय निर्माण झाला होता.

Story img Loader