मुंबईच्या वांद्रे वरळी सागरी सेतूवर शुक्रवारी सकाळी एका स्विफ्ट गाडीने मर्सिडीज गाडीला धडक दिली. या अपघातात कुणी जखमी झाले नाही. विशेष म्हणजे एका उंदराला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला.
 शुक्रवारी सकाळी एक स्विफ्ट गाडी सागरी सेतूवरून वांद्र्याच्या दिशेने जात होती. व्यावसायिक तरुण शाह (३५) गाडी चालवत होते. सेतूवरून एक उंदीर जात होता. तो चाकाखाली येऊ नये म्हणून शहा यांनी गाडीचे व्हिल वळण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात त्यांच्या गाडीने शेजारील मर्सिडीज गाडीला धडक दिली. मर्सिडीजचे चालक गौरव उज्जनवाल (४५) यांनी लगेच गाडी वाचविण्याच प्रयत्न केला. यात गाडीचे चाक (स्टिअरिंग व्हिल) लॉक झाले. पण त्यांनी गाडी थांबविण्यात यश मिळवले.  वरळी वाहतूक पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी येऊन दोन्ही गाडय़ा बाहेर काढल्या. केवळ उंदराला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचे शहा यांनी सांगितले. पंधरा मिनिटे वांद्रेच्या दिशेची वाहतूक कोलमडली होती.

Story img Loader