‘ज्यांना आपला इतिहास माहिती नसतो. त्यांना वर्तमान असते, मात्र त्यांना भविष्य नसते. यामुळेच आपला इतिहास, संघर्ष, संपूर्ण वाटचाल ही समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही विविध उपक्रमांच्या माध्यमातून करीत आहोत. मुंबईच्या सौंदर्यस्थळांमध्ये समावेश असलेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ या वास्तूला अनेकजण भेट देतात. यामुळे लोकांनी फक्त हे द्वार न पाहता, त्यांना इतिहास समजून प्रबोधन होणे गरजेचे आहे. जसजसे स्वातंत्र्याचे वर्ष वाढत जातात, त्याप्रमाणे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो. हा ‘मल्टिमीडिया लाइट अँड साउंड शो’ सुरू होतोय ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे,’ असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र पर्यटन विभाग, केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मल्टिमीडिया लाइट ॲण्ड साऊंड शो’चे उद्घाटन मंगळवार, २८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय नौदल वाद्यवृंदाने राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. याचसोबत प्रसिद्ध नर्तक शामक दावर आणि सहकाऱ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले.