मुंबई : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. फडणवीस हे लोमडी आणि मनोरुग्ण असल्याची टीका ठाकरे यांनी केली आहे. तर ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले.

मॉरिस नऱ्होना याने अभिषेकवर गोळय़ा झाडल्या की अन्य व्यक्तीने, दोघांना मारण्याची सुपारी कुणी दिली होती का, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबरोबर मॉरिसचे छायाचित्र कसे, गुंड असलेला मॉरिस आत्महत्या का करेल, घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रीकरण का दडवून ठेवण्यात आले, असे अनेक सवाल उपस्थित करीत ठाकरे यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेत सरकारवर सडकून टीका केली.

AnJali Damania on Dhananjay Munde
Anjali Damania : “दमानिया नव्हे बदनामिया”, धनंजय मुंडेंच्या टीकेवर अंजली दमानियांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “खरंतर मला…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Atishi alleges Arvind Kejriwal murder conspiracy
Atishi : अरविंद केजरीवालांच्या हत्येचा कट, मुख्यमंत्र्यांचे गंभीर आरोप; म्हणाल्या, “दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही, कारण…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल

हेही वाचा >>>मोटरमनच्या अपघाती मृत्यूमुळे असहकार चळवळ,  मुंबईत तब्बल १०० हून अधिक लोकल रद्द; सोमवारीही कोंडी होणार?

राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे. ते निर्दयी मनाचे असून माणसाच्या हत्येची बरोबरी श्वानाबरोबर करतो. कुत्रासुद्धा वफादार असतो, हे गृहमंत्री तर ‘लोमडी’ आहेत. यांना पदाचा कारभार झेपत नाही, अशा शब्दात ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. ठाकरे म्हणाले, पूर्वी गुंड-टोळय़ांमध्ये टोळीयुद्ध होत होते. आता सरकारमध्ये ते सुरू आहे. गुंडांना मिळणारे सरकारचे संरक्षण हा चिंतेचा विषय आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ४०० खासदार निवडून आणण्यासाठी हे सुरू आहे. हीच तर मोदी गँरंटी आहे,’ असे ठाकरे म्हणाले.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा आणि तात्काळ निवडणुका घ्या. सरकारवर नुसते ताशेरे ओढल्याचा उपयोग नसतो. कृपा करून जनतेला आणि लोकशाहीला वाचवा. तुम्ही शेवटची आशा आहात, असे आवाहन उद्धव यांनी न्यायपालिकेला केले. ‘भाजपमध्ये होणारे पक्षप्रवेश ‘भाजपमें आओ सब भूल जाओ’ असा प्रकार आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था इतकी ढासळली आहे की, पोलीस प्रमुखांना जनतेला पत्र लिहावे लागले. आगामी लोकसभा निवडणूक ‘तानाशाही विरुद्ध लोकशाही’ अशी होईल, असा दावा उद्धव यांनी केला.

कृषितज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार दिला आहे. स्वामिनाथन यांच्या कृषी शिफारशींची अंमलबजावणी मोदी सरकारने करून दाखवावी, असे आव्हान ठाकरे यांनी दिले.

हेही वाचा >>>फसवणुकीप्रकरणी मोहित कंबोज यांना दिलासा; प्रकरण बंद करण्यास नकार देणारा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश विशेष न्यायालयाकडून रद्द

युवक काँग्रेसकडून काळे झेंडे

राज्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्यावतीने नाशिक दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांच्या वाहन ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवण्यात आले. फडणवीस यांच्या हस्ते शहरात विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. त्यांच्या वाहनांचा ताफा त्र्यंबक रस्त्यावरून मार्गस्थ होत असताना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयेश पोकळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी फडणवीस यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

घटनेचा थेट राज्याच्या परिस्थितीशी संबंध जोडणे अयोग्य- फडणवीस

उद्धव ठाकरे यांची भाषा आणि त्यांचे शब्द पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे आपले ठाम मत झाले आहे. त्यांना लवकर बरे वाटावे ही ईश्वचरणी प्रार्थना, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांना दिले.

फडणवीस म्हणाले, राज्यात व्यक्तिगत वैमनस्यातून काही गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. मी त्यांची गंभीरता नाकारत नाही. परंतु, त्यांचा थेट कायदा व सुव्यवस्था आणि राज्याच्या परिस्थितीशी संबंध जोडणे अयोग्य आहे.  त्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

घोसाळकर प्रकरणात विजय वडेट्टीवारांनी केलेले आरोप म्हणजे काहीही माहिती नसताना केवळ सनसनाटी बोलणे आहे. अलीकडे गोपीचंद जासूस, जग्गा जासूस तयार झाले असून त्यांनी विचारपूर्वक बोलले पाहिजे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

छगन भुजबळ यांना आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सरकारच्यावतीने त्यांची काळजी घेतली जाईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.

‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा!’

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना लक्षात घेता महायुतीचे विद्यमान सरकार बरखास्त करावे आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली. राज्यात गुंडाराज सुरू असून जाती-धर्मात भेद निर्माण केला जात आहे, असा आरोप शिष्टमंडळाने केला .काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली या शिष्टमंडळाने शनिवारी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात भेट घेत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. या शिष्टमंडळात पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आदी नेते होते. दोन महिन्यापूर्वीही राज्यपाल महोदय यांना भेटून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात अवगत केले होते. राज्यपाल महोदयांनी पोलीस महासंचालकांना बोलावून कायदा सुव्यवस्थेबाबत सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. आता नवीन पोलीस महासंचालक आले आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्था आणखी ढासळली आहे. जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमी झाल्याचे पोलीस महासंचालक यांनी मान्य केले आहे, असे पटोले म्हणाले.

Story img Loader