मुंब्रा भागात राहणाऱ्या एका १४ वर्षिय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला धमकी देणाऱ्या तरूणास मुंब्रा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.
हेमंत कोळी (२७) असे यातील आरोपीचे नाव असून तो मुंब्रा भागातील आनंद कोळीवाडा परिसरातील एका इमारतीत राहतो. याच इमारतीमध्ये यातील पिडीत मुलीचे आजोबा राहतात. १९ जानेवारीला पिडीत मुलगी आजोबांच्या घरी गेली होती. तेथून घरी परतत असताना आरोपीने तिला पकडून घरामध्ये नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिला धमकी दिली.
 या प्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी हेंमतला अटक केली आहे. याच घटनास्थळी २२ जानेवारीला यातील पिडीत तरूणीचा विनयभंग करण्यात आला होता, त्यामध्ये अशाचप्रकारचा घटनाक्रम
होता. या प्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटकही केली होती. दरम्यान, या दोन्ही घटनांचा काही संबंध नसून त्या वेगवेगळ्या आहेत, असे एका वरीष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.