सोनसाखळी चोरी प्रकरणात अटकेत असलेल्या एका सराईत आरोपीने सोमवारी दुपारी बोरिवली पोलीस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केला. सोनसाखळ्या चोरीप्रकरणी असलम कुरेशी ऊर्फ वाटाणा मुश्ताक (२५) याला एमएचबी पोलिसांनी अटक केली होती. सोमवारी दुपारी तीन वाजता त्याने पोलीस कोठडीतील टय़ुबलाइटच्या काचा खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्वरित त्याला जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान चाटे यांनी सांगितले. मुश्ताक रिक्षाचालक आहे. रिक्षात बसलेल्या महिलांच्या सोनसाखळ्या तो चोरत असे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात ४० हून अधिक गुनांची नोंद आहे.

Story img Loader