परिसरातील महिलेवर केल्या जाणाऱ्या लैंगिक छळाविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेसह तीन वर्षांच्या मुलीला जिवंत जाळल्याच्या आरोपाप्रकरणी सत्र न्यायालयाने ३९ वर्षांच्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. अमरावती हरिजन (४६) आणि तिच्या शेजाऱ्यांच्या तीन वर्षांच्या मुलीला जिवंत जाळल्याप्रकरणी दीपक जाठ याला सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश ए. सुब्रमण्यम यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. जाठ हा परिसरातील एका महिलेचा लैंगिक छळ करत असल्याबाबत हरिजन हिने आवाज उठवला होता. त्याचा सूड म्हणून जाठ याने १४ एप्रिल २०१७ रोजी हरिजन आणि तिच्या शेजारच्या मुलीवर पेट्रोल ओतून त्यांना जाळले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> प्रदुषणामुळे श्वसनाचा विकार होणाऱ्या रुग्णांसाठी जे. जे. रुग्णालयात स्वतंत्र कक्ष

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, घटनेच्या दिवशी हरिजन ही १८ वर्षांची मुलगी आणि इतर शेजाऱ्यांसह घराबाहेर बसली होती. त्यावेळी, आरोपीने तिथे येऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या घटनेत, शेजारी आणि तिची तीन वर्षांची मुलगी जखमी झाले. उपचारादरम्यान हरिजन आणि तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तीन वर्षांच्या मुलीच्या आईची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाप्रकरणी न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षाही सुनावली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची प्रत उपलब्ध झालेली नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused get death penalty for burning woman who raised her voice against sexual harassment mumbai print news zws