नवी मुंबईतील पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या दत्तात्रय रोकडे या ५४ वर्षीय नराधमास ठाणे सत्र जलदगती न्यायालयाचे न्या. माळी यांनी अवघ्या तीन महिन्यांत सुनावणी पूर्ण करीत फाशी व जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. देशात बलात्कारांच्या गुन्ह्य़ांत वाढ होत असताना त्यांचे खटले मात्र बराच काळ रखडत असल्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर या निकालाने ‘देर भी नहीं और अंधेर भी नही’ असा संदेशच दिला आहे.
बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंर्तगत आरोपीला कमी कालावधीत शिक्षा होण्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड म्हणाले.
वाशी जवळच्या कोपरी गावात २२ जानेवारी रोजी आपल्या घराजवळच राहाणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून विकृत रोकडेने तिच्यावर पाशवी बलात्कार केला व नंतर तिची हत्या केली. दिल्लीतील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाने देश ढवळून निघाला असतानाच ही घटना उघडकीस आल्याने नवी मुंबई पोलीसही हादरून गेले होते. त्यांनी तात्काळ एक संशयित अरुण पवार याला अटक केली आणि त्यानेच हा बलत्कार व हत्या केल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही तासांत पोलिसांनी खऱ्या आरोपीला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused gets death penalty for raping killing minor girl in navi mumbai
Show comments