हत्या आणि चोरीसह अनेक गुन्ह्यांत पोलिसांना हव्या असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळून अटक केली आहे. त्याच्याजवळून एक गावठी कट्टा आणि ७ जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.

इर्शाद खान (वय ३५) असं या गुन्हेगाराचं नाव असून तो सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बांद्र्यातील मातोश्री निवासस्थानाबाहेर फिरत असल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी इर्शादवर चोरी, चोरीचा प्रयत्न आणि हत्येसारखे गंभीर गुन्हे मुंबई आणि गुजरात पोलिसांत दाखल आहेत.

Story img Loader