लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून वारंवार भांडण करणाऱ्या पतीची ४७ वर्षीय व्यक्तीने हत्या केल्याची घटना मानखुर्दमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी आरोपीला अटक केली.

मानखुर्द येथे वास्तव्यास असलेल्या मुरगन पडियाजी (३६) याला पत्नीचे येथील अण्णाभाऊ साठे नगरातील नाल्याजवळ राहणाऱ्या सेल्वन हरिजनसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. मुरुगनचे बुधवारी पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. याबाबत माहिती मिळताच सेल्वनही संतापला आणि त्याने मुरुगनच्या घराबाहेरच त्याच्यावर हल्ला केला. त्याने धारधार शस्त्राने मुरुगनवर वार केले. या हल्ल्यात मुरुगन गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.

हेही वाचा… मुंबईसह ठाणे, नवी मुंबईच्या काही भागात पावसाची हजेरी

मानखुर्द पोलिसांनी याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून सेल्वनला अटक केली. मात्र उपचारादरम्यान मुरुगनचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी सेल्वनविरोधात हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला. दरम्यान, यापूर्वी मानखुर्द पोलीस ठाण्यात सेल्वनविरोधात मारामारीचा गुन्हा दाखल आहे. त्याने हत्येत वापरलेल्या शस्त्राचा पोलीस शोध घेत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused killed husband on suspicion of having an affair with his wife in mumbai print news dvr