मुंबई : जागेच्या वादातून एका इसमाने गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री मानखुर्द येथे घडली होती. याबाबत मानखुर्द पोलिसांना गुन्हा दाखल करत गोळीबार करणाऱ्या आरोपीला सोमवारी नवीमुंबई परिसरातून अटक केली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
मुस्तकीन शेख (वय ५१) असे यातील आरोपीचे नाव असून त्याचा मानखुर्दच्या मंडाला परिसरात भंगाराचा व्यवसाय आहे. याच परिसरातील अन्य एका इसमाशी त्याचा जागेवरून वाद सुरू होता. रविवारीदेखील त्या दोघांमध्ये पुन्हा जागेवरून वाद झाला. त्यावेळी आरोपीने त्याच्याजवळ असलेल्या बंदुकीतून एक गोळी या इसमाच्या दिशेने झाडली. सुदैवाने ती गोळी कोणालाही लागली नाही. त्यामुळे यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मानखुर्द पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी यामध्ये गुन्हा दाखल करत, सोमवारी या आरोपीला नवीमुंबई परिसरातून अटक केली आहे.
First published on: 04-09-2023 at 23:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused of firing arrested from navi mumbai mumbai print news ssb